लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचा पुन्हा प्रयोग, हे उमेदवार उतरवले मैदानात
Prakash Ambedkar | वंचित बहुजन आघाडीने राजकारणातील नवीन वळण घेतले आहे. यापूर्वी बहुजन महासंघाचा प्रयोग करुन राज्यातील राजकारणात प्रकाश आंबडेकर यांनी वऱ्हाडी झटका दिला होता. आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या साथीने पुन्हा वंचितचा नवीन प्रयोग महाराष्ट्रात होऊ पाहत आहे.
अखेर महाविकास आघाडीशी काडीमोड घेत, वंचित बहुजन आघाडीने राज्यात नवीन राजकीय वळण घेतले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या साथीने हा प्रयोग राज्यात राबविण्यात येत आहे. बहुजन महासंघाचा अविश्वसनीय अकोला पॅटर्न प्रकाश आंबडेकर यांनी यापूर्वी यशस्वी करुन दाखवला होता. त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी या पॅटर्नला कोणत्याही पक्षाल दुर्लक्षित करता आलेले नाही. गेल्या वर्षाच्या मध्यानंतर राज्यात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या सर्व घडामोडींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात नवीन प्रयोगाला बळ दिले. त्यांनी उमेदवारांची नावे सुद्धा जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीसह महायुतीची त्यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर
• वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीच्यावतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
• वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीने सांगलीतून श्री. प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
• रामटेक मधील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होईल.
प्रकाश आंबेडकर कुठून लढणार
प्रकाश आंबेडकर हे अकोला येथून लढणार आहेत. त्यांनी स्वतःही घोषणा केली. गेल्यावेळी पण प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली होती. त्यांनी एमआयएमचे असुद्दीन ओवैसी यांच्यासोबत हातमिळवणी करत राज्यातील काही जागांवर उमेदवार जाहीर केले होते. ते स्वतः सोलापूरसह अकोल्यातून ताकदीनीशी लढले होते. एमआयएमसह वंचित बहुजन आघाडी छत्रपती संभाजीनगरामध्ये धक्का देण्यात यशस्वी झाली होती. यंदा वंचितसोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आहेत.
हे उमेदवार पण लढतीत
लोकसभा मतदार संघ उमेदवारांची नावे
- रामटेक आजच उमेदवाराची घोषणा
- भंडारा-गोंदिया – संजय केवट
- गडचिरोली-चिमूर- हितेश मडावी
- चंद्रपूर – राजेश बेले
- बुलडाणा – वसंत मगर
- अकोला – प्रकाश आंबेडकर
- अमरावती – कु. प्राजक्ता पिल्लेवान
- वर्धा – प्राध्यापक राजेंद्र साळुंके
- यवतमाळ-वाशिम – खेमसिंग पवार