Big Breaking : अखेर वंचित महाविकास आघाडीत?, संजय राऊत यांचं सर्वात मोठं विधान काय?

| Updated on: Jan 24, 2024 | 10:38 AM

Sanjay Raut | वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांची अमरावतीची सभा राजकीय नकाशावर आली. या सभेत त्यांनी वंचिताला सोबत न घेतल्यास काँग्रेस नेते तुरुंगात जाण्याचा सूचक इशारा दिला होता. आता खासदार संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यामुळे वंचितचा महाविकास आघाडीतील प्रवेश पक्का समजल्या जात आहे.

Big Breaking : अखेर वंचित महाविकास आघाडीत?, संजय राऊत यांचं सर्वात मोठं विधान काय?
Follow us on

मुंबई | 24 January 2024 : वंचित बहुजन आघाडी, महाविकास आघाडीत प्रवेशाची तारीख आणि मुहूर्त अद्याप लागत नव्हता. वंचितला सोबत घेण्याची भाषा करण्यात येत होती. पण प्रवेशा काही दिल्या जात नव्हता. त्यामुळे वंचितला सोबत घेतले नाहीतर काँग्रेसचे नेते तुरुंगात जाण्याचा सूचक इशारा न राहून वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. त्यांच्या अमरावतीच्या सभेला मोठी गर्दी होती. त्यानंतर त्यावर लागलीच प्रतिक्रिया उमटली. खासदार संजय राऊत यांनी वंचितच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

भिजत घोंगडं

महाविकास आघाडीत वंचितला घेण्याचे त्रांगडे सूटलेले नाही. उद्धव ठाकरे गटाशी वंचितची दिलजमाई झाली आहे. पण गेल्या वर्षभरापासून वंचितचा महाविकास आघाडीतील प्रवेशाला काही केल्या मुहूर्त लागत नसल्याने आंबेडकरच नाही तर कार्यकर्त्यांचा पण धीर सूटत चालला होता. वंचितने सर्वच्या सर्व 48 लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा पण इशारा दिला होता. आघाडीत काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट यांच्यासह वंचितचा सहभाग कधी होणार हा प्रश्न काही केल्या सूटत नव्हता.

हे सुद्धा वाचा

उद्याच्या बैठकीला आमंत्रण

दरम्यान रोहित पवार यांच्या ईडीच्या चौकशीसंदर्भात खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना वंचितच्या प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचितला देखील आमंत्रण दिल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे वंचितचा आघाडीतील प्रवेश पक्का समजण्यात येत आहे. उद्याच्या बैठकीनंतर याविषयीची अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

प्रवेशाचा निर्णय नाही

तर काँग्रेसकडून पण वंचितच्या प्रवेशाविषयी प्रतिक्रिया समोर आली आहे. लोकसभेच्या जागा वाटपाविषयी महाविकास आघाडीत चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे चर्चा करतील. वंचितच्या प्रवेशाविषयी आमची हरकत नाही. पण लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली नाही. त्यामुळे वंचितच्या प्रवेशाचा निर्णय जाहीर झाला नसल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे.