भारताच्या संविधानाचा जगभर आदर, संविधानिक मूल्य शालेय विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी: वर्षा गायकवाड
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी शैक्षणिक अभ्यास क्रमात संविधांनिक मूल्यांचा समावेश करावा, अशी मागणी झाली असल्याची माहिती दिली. संविधानिक मूल्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भात महत्वाची बैठक पार पडली.

मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी शैक्षणिक अभ्यास क्रमात संविधांनिक मूल्यांचा समावेश करावा, अशी मागणी झाली असल्याची माहिती दिली. संविधानिक मूल्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भात महत्वाची बैठक पार पडली. भारताच्या संविधानाचा जगभर आदर आहे. संविधान लहान मुलांनी आत्मसात व्हावे, यासाठी शिक्षण विभागाने पाऊले उचलली आहेत. नागरिकशास्त्राच्या पुस्तकातील संविधानाच्या अभ्यास अधिक वाढवत संविधानिक मूल्यांची लहान मुलांमध्ये जोपासना व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
नारायण राणे यांनी मार्च महिन्यात महाराष्ट्रातील सरकार नक्की पडेल आणि भाजपचं सरकार येईल यासंदर्भात दावा केलाय. याबाबत विचारणा केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी नारायण राणे मार्चमध्ये पुन्हा सरकार येईल म्हणत असतील तर ते यापूर्वी ही भाजपचं सरकार आलं का? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला. केंद्रीय मंत्र्याने असं स्टेटमेंट देताना भान ठेवले पाहिजे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
एसटी संपावर चर्चेतून मार्ग निघेल
वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रातील एसी कामगारांच्या संपावर देखील भाष्य केलं. सध्या एस टी कामगारांचा संप सुरूच आहे. सरकारने त्यांना पगारवाढ दिली आहे. मंत्री,पालकमंत्री,आमदार आपापल्या भागातील एस टी कामगारांशी संवाद साधत आहेत आणि चर्चेतूनच यावर मार्ग निघणार आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत सूचना मागवल्या
प्राथमिक शाळा सुरू करतांना टास्कफोर्स च्या नियमावली बरोबर पालक,शिक्षकांच्या सूचना आम्ही मागवल्या आहेत. या सूचनांवर विचार करत सरकार 1 डिसेंबर पासून प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या तयारीत आहे. शाळा सुरु करताना कोरोना नियमांचं पालन करण्यात येईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. येत्या 1 डिसेंबरपासून ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा सुरु होत आहेत.
इतर बातम्या:
Varsha Gaikwad said Constitutional values will be include in School Syllabus