सलमानला तासाभरात जामीन मिळतो, मला का नाही? वसईत डॉक्टरने थेट न्यायाधीशांच्या दालनाला टाळं ठोकलं
न्याय मागण्याचा अनोखा प्रकार वसई न्यायालयात घडला. न्याय मागण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एका व्यक्तीने चक्क न्यायाधीशांच्या दालनालाच टाळं ठोकून, त्याला सील केलं.
वसई : न्याय मागण्याचा अनोखा प्रकार वसई न्यायालयात (Vasai court Judge’s Chamber lock) घडला. न्याय मागण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एका व्यक्तीने चक्क न्यायाधीशांच्या दालनालाच (Vasai court Judge’s Chamber lock) टाळं ठोकून, त्याला सील केलं. गुरुवारी ही घटना घडली. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
वसई न्यायालयातील न्यायाधीश आणि कर्मचारी गुरुवारी दुपारी जेवायला गेले होते. त्यावेळी अज्ञाताने सहदिवाणी न्यायाधीश, क स्तर न्यायाधीश एस.बी. पवार यांच्या चेंबर रुमच्या दरवाजाला टाळे ठोकले.
या कुलुपासोबत एक चिठ्ठी लावण्यात आली होती. या चिठ्ठीमध्ये मुंबई सेशन कोर्टाने सलमान खान याला 5 वर्षाची शिक्षा दिली असतानाही तीन तासात उच्च न्यायालयाने जामीन दिला. मी कर भरतो, त्यातून न्यायाधीशांना पगार मिळतो तर मला का न्याय मिळत नाही, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर डॉ. फैय्याज खान असे नाव लिहण्यात आले होते.
या घटनेची माहिती मिळताच न्यायालय परिसरात एकच चर्चा सुरु होती.