अविनाश जाधव यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, मनसे कार्यकर्ते संतापले, वसईत राडा

मनसे नेते अविनाश जाधव यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाप्रकरणी वसईत राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याचा आरोप करण्यात येतोय.

अविनाश जाधव यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, मनसे कार्यकर्ते संतापले, वसईत राडा
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 7:45 PM

वसई : राज्यातील राजकारण सध्या कोणत्या पातळीवर पोहचलंय? असा प्रश्न सध्या वारंवार उपस्थित होतोय. कारण तशाप्रकारच्या घटना सध्या वारंवार घडत आहेत. राज्यातील बड्या राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीका करताना पातळी सुटत असल्याचं याआधी बघायला मिळालं. त्यानंतर आता आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यावरुन सुरु होणारा वाद थेट हाणामारी आणि तोडफोडपर्यंत जाऊन पोहोचताना दिसत आहे. पालघर जिल्ह्यातील वसईत हाच प्रकार बघायला मिळाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मनसे नेते अविनाश जाधव यांच्याबद्दल आपक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे संतापलेल्या मनसे सैनिकांनी ठाकरे गटाच्या शिवसेना जिल्हा सचिवाच्या कार्यालयात जावून तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही रविवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांवर कार्यालयात जबरदस्ती घुसने, तोडफोड करणे, महिलेचा विनयभंग आणि धक्काबुक्की करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

नेमकं प्रकरण काय?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा सचीव प्रमुख अनिल चव्हाण यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून मनसे नेते अविनाश जाधव यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याचाच जाब विचारण्यासाठी मनसेचे वसई विरार शहर अध्यक्ष प्रवीण भोईर हे आपल्या 10 ते 15 पदाधिकाऱ्यांसह अनिल चव्हाण यांच्या कार्यालयात जबरदस्तीने घुसले. यावेळी त्यांनी शाब्दिक बाचाबाची करून, कार्यालयाची तोडफोड केली. तसेच महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणावर मनसेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आमच्या नेत्याबद्दल तथ्यहिन आरोप करत होते. आम्हाला त्यांनी चर्चेसाठी बोलावलं. चर्चा सुरु असताना त्यांनी समोरुनच शाब्दिक वाद वाढवला. आम्ही कोणत्याही महिलेला धक्काबुक्की किंवा शिवीगाळ केलेली नाही किंवा कार्यालयाची तोडफोड केली नाही, मनसेचे वसई विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांनी सांगितलं.

याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण भोईरसह, रवी पाटेकर, अमित पाटील, पंकज सावंत यांच्यासह 14 जणांवर कार्यालयात जबरदस्ती घुसने, तोडफोड करणे, महिलेचा विनयभंग, धक्काबुक्की असे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी आज घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आली नाही. तसेच या प्रकरणावर पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.

ठाण्यात याआधी शिवसेना आणि ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये वाद

विशेष म्हणजे याआधी ठाण्यात ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची बातमी समोर आली होती. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिलेच्या कार्यालयात जाऊन तिला मारहाण केली. रोशनी शिंदे असं या महिला पदाधिकाऱ्याचं नाव होतं. या महिलेला मारहाण झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. घटनेची माहिती मिळताच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:ठाण्यातील रुग्णालयात जाऊन रोशनी यांच्या प्रकृतीची चौकशी केलेली. तसेच पोलिसात तक्रार केलेली. या प्रकरणावरुनही मोठा वाद उफाळला होता.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.