वसईमधील हत्येमागची ‘हेट स्टोरी’, सनकी आशिकचे नवीन कांड समोर
मुंबईमध्ये वसई येथे आरती यादव या तरूणीची भर दिवसा तिच्याच प्रियकराने हत्या केली. कसायासारखा तो तिच्यावर घाव घालत होता. प्रेम आपल्याला सोडून चाललं आहे या संशयातून त्याने हत्या केल्याचं समोर आलं होतं. अशातच या प्रकरणात आणखी नवीन माहिती समोर आली आहे.
देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील वसई येथे एका प्रियकराने भरदिवसा आपल्याच प्रेयसीची हत्या केली. मंगळवारी सकाळी मृत तरूणी आरती यादव कामावर जात असताना आरोपी रोहित यादवे तिच्यावर हल्ला केला. नट बोल्ट फिट करण्याचा पाना त्याने डोक्यात मारत तिला जागेवरच संपवलं. या हत्येने खळबळ उडाली होती, सनकी आरोपीने अवघ्या काही सेकंदात आपल्याच प्रेमाचा जीव घेतला. आरोपी रोहित यादव याने इतकं मोठं पाऊल का उचललं? रोहित यादव आणि आरती यादव यांचे मागच्या सहा वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कोर्टाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याच सनकी आशिकचे नवीन कांड समोर आलं असून त्याने आधी चोरी केली होती. ही चोरी म्हणजे गुन्ह्यात वापरलेलं हत्यार पान्याची होती.
…अन् रोहितने आरतीला संपवण्याचं ठरवलं
दोघांचेही मागील सहा वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून दोघांमध्ये दुरावा तयार झाला होता. दोघांच्या लग्नाबाबतही घरी बोलणं सुरू होतं. मात्र रोहितचं स्वत:चं घर असावं अशी अट आरतीच्या घरच्यांनी घातली होती. रोहित आरतीला बोललाही माझी वहिनी मला मुलगी पाहत आहे. त्यावर आरती बोलली की तुला लग्न करायचं असेल तर करू शकतो. आधीच हे सुरू असताना आरती दुसऱ्या कोणत्या मुलासोबत बोलत असल्याचा संशय रोहितला येऊ लागला.
पोलिसांसमोर रोहितने स्पष्ट सांगितलं की, आरतीच्या वडिलांना बोललो होतो की आमच्यात काही ठिक नाही आणि आरतीचे ऑफिसमध्ये कोणाशी तरी अफेअर आहे. त्यानंतरही आरती तिच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीशी बोलायची. त्यामुळे आरोपी रोहित इतका संतापला की त्याने मुलीची हत्या करण्याचा कट रचला. रोहित ज्या ठिकाणी काम करायचा तिथून त्याने पाना चोरला.
मंगळवारी सकाळी रोहित आरतीसोबत गेला आणि तिला थांबवलं. दोघांमध्ये बाचाबाची झाली त्यावेळी रोहितने आपल्याजवळील पान्याने आरतीवर घाव घातले. हे घाव इतके गंभीरपणे घालत होता की त्याने काही सेकंदात आरतीला संपवलं. इतकंच नाहीतर आरतीचे प्राण गेल्यावरही तो तिच्यावर पान्याने डोक्यात घाव घालत होता. तिच्या चेहऱ्याला हात लावत तो का केलंस असं? असं बोलत होता. आरतीचा जीव जात होता तेव्हा रोहितला अडवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. एकजण आला होता मात्र त्याच्यवर रोहित धावून गेल्यामुळे तोसुद्धा बाजूला झाला. त्यानंतर प्रत्येकजण आरतीच्या मृत्यूचे व्हिडीओ आपल्या फोनमध्ये शुट करत होता.
दरम्यान, आरोपी रोहित यादव हा वालीव पोलिसांच्या पोलीस कस्टडीत आहे.असून पोलीस त्याचा कसून तपास करीत आहेत. त्याने इतक्या क्रूरतेने आरतीची हत्या का केली? याला आणखी काही कारण आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.