वसई हत्या प्रकरणात मोठी अपडेट! मयत तरूणीच्या बहिणीचा खळबळजनक दावा, मृत तरूणीसोबत दोन दिवसांआधी…
वसई हत्या प्रकरणाबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मयत तरूणीच्या बहिणीने दोन दिवसांआधी काय घडलं होतं? याबाबत माहिती देताना आरोपीने तिचा फोन फोडत मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली.
वसईमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीची भरदिवसा डोक्यात पान्ह्याचे घाव घालत हत्या केली. दोघांचेही प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आरोपी रोहित यादव (29) आणि आरती यादव (20) यांच्यात बिनसलं होतं. रोहितला संशय होता की आरतीचं इतर कोणत्यातरी मुलासोबत अफेर आहे. आरतीला मारण्याआधी त्याने वाट अडवली तेव्हा दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली त्यानंतर रोहितने हल्ला करत तिला संपवलं. अशातच या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
या प्रकरणातील मृत तरूणी आरती यादव हिच्या बहिणीने आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी करत दोन दिवसांआधी म्हणजेच शनिवारी काय घडलं होतं, याबाबत माहिती दिली आहे. माझ्या बहिणीला अगोदर ही मारण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही रविवारी वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात ही गेलो होतो. पोलिसांनी आरोपी रोहितला एक दोन दंडे मारून सोडून दिले. माझ्या बहिणीचा मोबाईल ही शनिवारी तोडला होता, तेही आम्ही पोलिसांना सांगितले होते. माझ्या वडिलांनी तब्येत बरोबर नव्हती म्हणून ती कामाला जात होती. आम्हाला न्याय पाहिजे, अशी मागणी मयत तरूणी आरती यादव हिच्या बहिणीने केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
रोहित यादव आणि आरती यादव यांचे प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये बिनसलं होतं. रोहितला संशय होता की आरतीचे बाहेर इतर दुसऱ्या कोणासोबत संबंध आहेत. आरतीच्या वडिलांची तब्येत बरी नसल्याने ती गेल्या महिन्यामध्ये वसईमधील एका कंपनीमध्ये कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी रोजच्याप्रमाणे की कामावर निघाली होती, गावराई पाडा येथील स्टेट बँके समोर त्याने आरतील अडवलं. दोघांमध्ये वाद झाला मात्र काही वेळाने रोहितने आपल्या जवळील पान्ह्याने तिच्या डोक्यात गंभीर घाव घातले. तो इतक्या जोरात घाव घालत होता की आरतीचा जागेवरच मृत्यू झाल.
दरम्यान, आरोपी रोहितने आरतीवर १५ घाव घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रोहित मारत असताना तिथे असलेल्या कोणीच वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. सर्वांनी आरतीचं मरण मात्र आपल्या फोनमध्ये शुट केलं.