Vasai Rain | वसई विरारमध्ये रात्रभर मुसळधार, रस्ते जलमय, जाधव पाड्यात 80 रहिवाशांची सुटका
विरार : वसई विरार भागात मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला. जवळपास चार तास पडलेल्या पावसाने वसई विरारमधील सर्वच रस्ते, सखल भाग पाण्याखाली गेला. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. सकाळच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली तरीही सर्व परिसर जलमय झाला होता. विरार पूर्व कण्हेर फाटा येथील जाधव पाड्यात अडकलेल्या 80 नागरिकांना पहाटे बाहेर काढले आहे. विरार पूर्व विवा […]
विरार : वसई विरार भागात मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला. जवळपास चार तास पडलेल्या पावसाने वसई विरारमधील सर्वच रस्ते, सखल भाग पाण्याखाली गेला. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. सकाळच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली तरीही सर्व परिसर जलमय झाला होता.
विरार पूर्व कण्हेर फाटा येथील जाधव पाड्यात अडकलेल्या 80 नागरिकांना पहाटे बाहेर काढले आहे. विरार पूर्व विवा जहांगीड, मनवेलपाडा, विरार पश्चिम विवा जहांगीड, एम बी इस्टेट, नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नगीनदासपाडा, आचोले रोड, संतोषभूवन, वसई एव्हरशाईन, वसंतनागरी हा परिसर पूर्ण जलमय झाला आहे.
नेमकं काय घडलं?
मध्यरात्री अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने रहिवासी झोपेत असताना काही समजण्याच्या आधीच सर्वत्र हाहाःकार माजला होता. कनेर फाटा जाधव नगर येथील बाजूचा नाला तुडुंब भरुन सर्व पाणी चाळीतील घरात शिरले होते. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नागरिक भयभीत झाले होते. मध्यरात्री वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी तीनच्या सुमारास घटनास्थळी पोहचून 80 नागरिकांना बाहेर काढले आहे.
वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांनी दोरीच्या साहाय्याने 20 लहान मुलं, 25 महिला (यापैकी तीन गर्भवती), 30 पुरुष आणि 7 ते 8 शेळ्या बकऱ्या यांना सुखरुप बाहेर काढले. हे बचावकार्य पहाटे 5 वाजेपर्यंत चालले होते. अग्निशमन दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही
दरम्यान, वसई ते वसई फाटा कडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला. वसई मुख्य रस्त्यावर गुडघाभार पाणी साचल्याने, अनेक वाहनं बंद पडली. वसई मिठागराला पूर्णपणे पाण्याचा वेडा पडला आहे. वसई फाट्याकडे जाणारा रस्ता, एव्हरशाईन सिग्नल, वसंत नागरी सिग्नल, सर्व पाण्याखाली गेले होते.
संबंधित बातम्या :
मुंबईतील विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मुंबईत पावसाचा हाहाकार, चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 14 जणांचा मृत्यू
(Vasai Virar Rain Update Jadhav Vasti Flood Water Mumbai Rains)