‘मोदी का परिवार’वरून प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला घेरलं; म्हणाले, मोदींनी आधी त्यांच्या….
मुंबईमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होत आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणामध्ये भाजपच्या 'मोदी की परिवार'वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा आज मुंबईत समारोप होत आहे. इंडिया आघाडीचं शिवतीर्थावर शक्ती प्रदर्शन सुरू आहे. देशातील सर्व विरोधी पक्षांचे प्रमुख नेते शिवाजी पार्कवर उपस्थित आहेत. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपच्या ‘मोदी की परिवार’वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
आपल्याला लढलं पाहिजे. सोबत लढू किंवा एकटे लढू पण लढलं पाहिजे. मी देशभरातील परिस्थिती सांगत आहे. कारण बंगालमध्ये वेगळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात एकत्र लढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण दोन गोष्टी आहेत. त्या मोठी आहेत, हे मला वाटतं. इलेक्ट्रॉल बाँड आलं आहे. प्रत्येक चॅनलवर अमित शाह यांची प्रतिक्रिया आली आहे. आम्ही काळापैसा पळवून लावला आहे, असं अमित शाह म्हणत आहे.
मोदींना तुम्ही इलेक्ट्रॉल बाँडवरून सवाल विचारणार की नाही. अमित शाह यांनी त्या कंपनीकडे १३०० कोटी रुपये आले कुठून याचं उत्तर द्या. त्या कंपनीची ईडी चौकशी केली पाहिजे. प्रियंका गांधी यांची विनंती आहे, मोदी म्हणतात देश आपलं कुटुंब आहे. देश त्यांचं कुटुंब आहे. पण त्यांच्या खऱ्या कुटुंबातील एक महिला त्यांच्यासोबत राहत नाही, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आपण या मुद्द्याला उचललंल पाहिजे. हिंदू समाजात कुटुंबाचं नातं सर्वात गहन असतं. मोदींनी ते नातं निभावलं पाहिजे. मोदींनी त्यांच्या पत्नीसोबत राहावं. खरगे जेव्हा बोलतील. त्यावर ते बोलतील अशी आशा आहे. कारण मोदी हिंदू संस्कृती आणि हिंदू रिवाजची गोष्ट करतात. पण ते मानत नाही. पर्सनल गोष्ट आहे. मी मानतो. पण संस्कृतीची चर्चा संघाने सुरू केली. ते जर संस्कृती पाळत नसेल तर त्यांना आपण समजावलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.