शिवकाळात लाईट कसे…? या प्रश्नावर महेश मांजेरकरांचं उत्तर बघितलं का…?
सिनेमात लाईटवाल्या झुंबर कसा, याबाबत आम्ही दिग्दर्शक महेश मांजरेकरांशी संवाद साधला. त्यावर तो सेटवरचा लाईट असू शकतो. सेटवर लाईट नसतात का., असं मांजरेकरांनी म्हटलं आहे.
मुंबईः ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ज्यामध्ये शिवकाळात लाईट कसे या प्रश्नावरुन आता नेटकऱ्यांनी अक्षय कुमार आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना ट्रोल केलं आहे. वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाचा फर्स्ट लूक अक्षय कुमारनं शेअर केला आहे. मात्र या व्हिडीओमध्ये चक्क लाईटवाले झुंबर दिसल्यामुळे दिग्दर्शक महेश मांजरेकरांचं ट्रोलिंग सुरु झालं आहे.
या दृश्यामध्ये वरच्या भागात हे 3 भागात विभागलेलं झुंबर आहे. आणि ज्यामध्ये स्पष्टपणे बल्प लावलेले दिसत आहेत. म्हणून शिवाजी महाराजांच्या काळात वीज होती का?
दिव्यांचा शोध लावणारा थॉमस अल्वा एडिसन 16 व्या शतकात झाला का? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकरांना करण्यात आले आहेत. यावरूनच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनीही जोरदार टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला अक्षय कुमारची देहयष्टी साजेशी नाही, यावरुनही टीका होऊ लागली आहे. सोशल मीडियात याआधीच्या कलाकारांनी साकारलेल्या शिवछत्रपतींच्या भूमिकांबरोबरही त्याची आता तुलना होऊ लागलीय.
अमोल कोल्हेंनी राजा शिवछत्रपती मालिकेत साकारलेले शिवराय, संभाजी महाराज मालिकेतील शंतनू मोघे, तानाजी सिनेमातील शरद केळकर, चिन्मय मांडलेकरनं साकारलेले शिवाजी महाराज आणि आता अक्षय कुमार साकारत असलेले शिवराय… शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमारऐवजी इतर चारही अभिनेते जास्त जवळचे वाटतात अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नेसरीच्या लढाईचा कुठेही लिखीत इतिहास नसल्याचा नवा दावा काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी केला होता.
त्यामुळे दिग्दर्शकाकडे असणाऱ्या लिबर्टीचं राज ठाकरेंनी स्वागत केलं होतं. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे, याचं वर्णन अनेक इंग्रज आणि समकालीन निरीक्षकांनी नोंदवलं आहे. शिवरायांची उंची ही मध्यम किंवा त्याहूनही कमी होती. नजर तिष्ण आणि दाढी निमुळती होती., हे वर्णन अनेक नोंदीत सापडलं. मात्र अक्षय कुमारची उंची 6 फूट 2 इंचाहून जास्त आहे.
शिवाय अलीकडच्या काही सिनेमांमधून शिवरायांच्या कपाळावर शिवगंध किंवा चंद्रकोराऐवजी उभा गंध दिसत असल्यानं आश्चर्य व्यक्त होतं आहे.
याआधीच्या मालिका किंवा सिनेमांमध्ये शिवरायांच्या कपाळावर शिवगंध किंवा चंद्रकोर असायची मात्र महेश मांजरेकर दिग्दर्शित मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, वेडात मराठे वीर दौडले सात यासारखे सिनेमे असोत किंवा तानाजी आणि हर-हर महादेव या सिनेमांमध्ये शिवाजी महाराजांच्या कपाळावर उभा गंध दाखवण्यात आला आहे.
दरम्यान सिनेमात लाईटवाल्या झुंबर कसा, याबाबत आम्ही दिग्दर्शक महेश मांजरेकरांशी संवाद साधला. त्यावर तो सेटवरचा लाईट असू शकतो. सेटवर लाईट नसतात का., असं मांजरेकरांनी म्हटलं आहे.
मात्र जर हा सेटवरचा लाईट असेल आणि तो फ्रेममध्ये येणार नसेल तर मग सेटवरचे लाईट झुंबरच्या आकारात आणि ते सुद्धा इतकी सजावट केलेले कसे? हा प्रश्नही अनुत्तरितच राहिला आहे.