मुंबईत टोमॅटो, वाटाण्याची शंभरी, पेट्रोल डिझेलच्या दराशी भाजीपाल्याची बरोबरी

राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. आता याचा फटका ग्राहकांना बसत असल्याचं दिसत आहे.

मुंबईत टोमॅटो, वाटाण्याची शंभरी, पेट्रोल डिझेलच्या दराशी भाजीपाल्याची बरोबरी
टोमॅटो
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 9:21 AM

मुंबई : राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. आता याचा फटका ग्राहकांना बसत असल्याचं दिसत आहे. अवकाळी पावसामुळं टोमॅटोचं उत्पादन घटलं असून बाजारपेठेत टोमॅटोचे भाव 80 ते 100 रुपये किलोंवर पोहोचले आहेत. टोमॅटोची आवक घटल्यानं दरवाढ झाल्याचं मुंबईतील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ झाल्याने ही दरवाढ करण्याशिवाय पयार्य नसल्याचे भाजी विक्रेते म्हणत आहेत.

टोमॅटोची आवक घटली

शेतकऱ्यांकडून बाजारपेठेत पाठवण्यात येणारा माल कमी झाला आहे. अवकाळी पावसामुळे टोमॅटोची आवक घटली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर मध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं हजेरी लावली होती. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून बाजारपेठेत येणाऱ्या मालाची आवक घटली आहे.

मुंबईत टोमॅटो 80 ते 100 तर वाटाणे 125 रुपयांवर

मुंबईत टोमॅटोचा भाव 80 रुपयांच्या वर असून काही ठिकाणी 100 रुपयांना किलो विकला जात आहे. वाटाणे 125 रुपये किलो आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील अनेक भागात आज टोमॅटो 100 रुपयांच्या वर विकला जात आहे. काही भागात त्याची किंमत 111 रुपये प्रति किलो इतकी नोंदवली जात आहे.

दरवाढ होण्याची कारणं कोणती?

पेट्रोल डिझेलनंतर आता भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. अवकाळी पावसामुळे भाज्या महागल्याचं बोललं जातंय. लहरी पावसामुळे घटलेले उत्पादन, आणि इंधन दरवाढ आणि यामुळे भाज्याचे दर कडाडले आहेत. घाऊक बाजारात वाढ झाल्याने या सर्व भाज्या किरकोळीत दुप्पट ते तिप्पट दराने विकल्या जात आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ झाल्याने ही दरवाढ करण्याशिवाय पयार्य नसल्याचे भाजी विक्रेते म्हणत आहेत.

पुण्यातही टोमॅटोचे भाव वाढले

पुण्यातील बाजारपेठेत टोमॅटो 80 ते 100 रुपये किलो प्रमाणं विकला जातोय. मार्केट यार्डमध्ये कमी प्रमाणात आवक असल्यानं दर वाढ होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणनं आहे. अवकाळी पावसाने बाजारपेठेत टॉमेटोची आवक घटली आहे. बाजारापेठेत दाखल झालेले टोमॅटो खराब होण्याचं प्रमाण देखील जास्त असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं आहे.

इतर बातम्या:

­ऐकावं ते नवलच ! ओडिशात 63 कोंबड्यांना हार्ट अटॅक, लग्नाची वरात, मृत्यू दारात, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

पीएफ हस्तांतरण झाले सोपे; ‘ईपीएफओ’चा मोठा निर्णय, खासगी कर्मचाऱ्यांना दिलासा

Vegetable prices soar in Mumbai due to high fuel prices and rainfall tomatoes reach to eighty to hundred rupees

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.