Corona Virus | जमावबंदी झुगारुन मुलुंड टोलनाक्यावर वाहनांची गर्दी, खासगी वाहनांच्या रांगा

मुलुंडमधील आनंद नगर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात चार चाकी गाड्यांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत (People Rush Mulund Maharashtra LockDown) आहे.

Corona Virus | जमावबंदी झुगारुन मुलुंड टोलनाक्यावर वाहनांची गर्दी, खासगी वाहनांच्या रांगा
Follow us
| Updated on: Mar 23, 2020 | 11:41 AM

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (People Rush Mulund Maharashtra LockDown) आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात जमावबंदीचे आदेश दिले आहे. मात्र हे आदेश झुगारुन अनेक नागरिक घराबाहेर पडल्याचे पाहायला मिळत आहे. मुलुंडमधील आनंद नगर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात चार चाकी गाड्यांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

मुलुंडमधील आनंद टोल नाक्यावर आज (23 मार्च) सकाळच्या सुमारास (People Rush Mulund Maharashtra LockDown) प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. या टोलनाक्यावर चार चाकी वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. यात अनेक वाहन ही खाजगी असून हे सर्व नागरिक कामासाठी घराबाहेर पडले आहे.

मात्र मुंबई पोलिसांनी सजग राहत जे लोक अत्यावश्यक सेवेचा भाग आहेत, त्यांनाच मुंबईच्या दिशेने सोडत आहेत. तर इतर गाड्यांना परत माघारी पाठवत आहे.

तर दुसरीकडे मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर बाहेरच्या राज्यातून कामानिमित्ताने आलेल्या तरुणांची गर्दी पाहायला मिळत आहे. सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या बंद झाल्याने या नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे.

यातील अनेक प्रवाशांनी आक्रमक पावित्रा धारण करत आम्ही आता खाणार काय, कुठे जाणार? असे अनेक प्रश्नही नागरिक विचारत आहे.

कोरोनाबाधितांचा आकडा 74 वरुन 89 वर

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 15 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत 14, तर पुण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 74 वरुन 89 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे आणखी एका कोरोना रुग्णाचा बळी गेला आहे. फिलिपिन्सवरुन आलेल्या नागरिकाचा आज (23 मार्च) मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात जमावबंदी

‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 31 मार्चपर्यंत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जनता कर्फ्यूची वेळ संपलेली असली, तरी आता स्वयंशिस्त पाळण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू झाली असून त्यानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र फिरता येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली.

त्यानंतर आज सकाळी 5 ते 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रात जमावबंदी लागू करण्यात आली. तसेच, जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाणार (People Rush Mulund Maharashtra LockDown) आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.