मुंबईतील पावसाळी ढंगाच्या विहंगम दृश्याचा Video व्हायरल
मुंबईत पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. काल मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसला आहे. मध्य रेल्वेचा लोकल मार्ग ठप्प झाला आहे.त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांची आज सक्तीची सुट्टी मिळाली आहे. या पावसाचा मुंबईतील उत्तुंग इमारतीवरुन घेतलेला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
मुंबईत पावसाळा सुरु झाला याची खूनगाठ जेव्हा मुंबईची लोकल जेव्हा ठप्प होते तेव्हाच होतो. कारण पावसाची जोरदार एण्ट्री लोकल ठप्प झाल्याने होते. यंदा मुंबईत जून महिन्यत पाऊसाने एण्ट्री केली तरी लोकल बंद झाल्या नव्हत्या. कारण काही मिनिटे पाऊस सलग कोसळला तर मध्य रेल्वेच्या मार्गातील सखल भागात पाणी साचते. रेल्वेच्या रुळांवर एकदा का पाणी साचले की लोकलचे मोटरमन रुळांचा अंदाज घेत आधुनिक डिजिटल सिंगल एक्सेल काऊंटवर यंत्रणेवर विसंबन लोकल चालवू शकतात. परंतू पाण्याची पातळी जर जास्तच वाढली तर हे सर्किट देखील ब्रेक होते. त्यामुळे पाण्याने बुडलेल्या रुळांवरुन लोकल चालविणे धोक्याचे असते. म्हणून लोकलचा वेग मुंगी सारखा होतो. मुंबईत उपनगरीय मार्गावर लोकल सेवा सुरळीत चालण्यासाठी डिजिटल एक्सेल काऊंटर यंत्रणा चुस्त असणे गरजेचे असते. ती एकदा का ब्रेक झाली की लोकल थांबविण्याशिवाय पर्याय नसतो.
येथे पाहा व्हिडीओ –
#MumbaiRains pic.twitter.com/6W8W7ztV7L
— Mumbai Rains (@IndiaWeatherMan) July 8, 2024
मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाच्या सरी बरसल्याने लोकल ट्रेन बंद झाल्या आहेत. मुंबईतील आपातकालिन यंत्रणा सर्तक झाली आहे. पाणी तुंबलेल्या जागांवर बेस्टच्या वीज उपक्रमातील अधिकारी दाखल झाले आहेत. महापालिकेने डिझास्टर कंट्रोल रुममध्ये सर्व अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. अशा मुंबईतील उच्च इमारतीच्यावरुन ढगांची कशी गर्दी झाली आहे. याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. समाजमाध्यमावर @IndiaWeatherman नावाच्या एक्स हॅंडलवरुन हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.