Video : तौत्के चक्रीवादळाच्या तांडवातून वाचलेले ‘मृत्यूंजय’! 24 तासापेक्षा अधिक काळ समुद्रात काढल्यानंतर वाचले प्राण
तोत्के चक्रीवादळात समुद्रात जहाजांवर अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी नौदलाकडून बचावकार्य सुरु आहे.
मुंबई : तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यात बाँम्बे हाय परिसरात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू करण्याचं काम सध्या सुरु आहे. हिरा ऑईल फिल्डमधील ‘बार्ज पी – 305’ वरच्या जवळपास दिडशे कर्मचाऱ्यांना वाचवण्यात तटरक्षक दल आणि शोध पथकांना यश आलंय. चक्रीवादळामुळे भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता या युद्दनौका, तसंच ग्रेटशिप अहिल्या आणि ओशन एनर्जी या जहाजांच्या सहाय्यानं समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आलीय. दरम्यान, बार्ज पी – 305 वरील काही जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या होत्या. एक रात्र आणि एक दिवस पाण्यात राहिलेल्या या कर्मचाऱ्यांना वाचवण्यातही तटरक्षक दलाला यश मिळालंय. (Safe release of ONGC workers stranded at sea during Taukate cyclone)
हरियाणाच्या सतिश यांचा थरारक अनुभव
तौत्केच्या तांडवातून वाचलेल्या हरियाणाच्या सतिश यांनी दिलेल्या माहितीनुसार, “बार्ज पी – 305 जहाजावर अडीचशे ते तीनशे कर्मचारी होते. वादळ उठल्यानंतर कंपनीने जहाज किनाऱ्यावर आणायला हवं होतं. पण तसं करण्यात आलं नाही. वादळात 10 ते 15 मीटरच्या लाटा उसळत होत्या. वादळाच्या तडाख्यात एक एक करुन 2 ते 3 तासांत सगळे अँकर तुटले आणि जहाज वाहून जाऊ लागलं. एका ठिकाणी ते आदळल्यानंतर त्यात पाणी भरण्यास सुरुवात झाली. यात 50 ते 100 लोक आतमध्येच गेले. जहाज बुडत असल्याचं पाहून आम्ही काहीजणांनी लाईफ जॅकेट घातले आणि जवळपास 60 फुटावरुन समुद्रात उड्या घेतल्या. त्यावेळी आम्हाला दुखापत झाली. पण सुदैवाने आम्ही वाचलो. आम्ही दुपारी 3 ते 4 वाजता पाण्यात उड्या घेतल्या होत्या. पूर्ण रात्र आणि दिवस पाण्यात काढल्यानंतर तटरक्षक दलाने आम्हाला वाचवलं”, अशा शब्दात सतिश यांनी आपली आपबिती सांगितली. सतिश यांनी दिलेल्या माहितीवरुन आपण अंदाज बांधू शकतो की भर समुद्रात तौत्के वादळानं काय थैमान घातलं असेल.
तेल विहिरींवर अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध सुरुच
तौत्के चक्रीवादळात तीन जहाजं समुद्रात अडकून पडली होती. त्या जहाजांवर ओएनजीसीसाठी काम करणारे कर्मचारी होते. समुद्रातील ऑईल फिल्डवर एका प्रकल्पाचे काम सुरु आहे. त्यावरील हे कर्मचारी असल्याचं ओएनजीसीने म्हटलंय. आतापर्यंत एकूण 148 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. अन्य कर्मचाराचा शोध सुरु असल्याची माहिती देण्यात आलीय.
#CycloneTauktae#Update Search & Rescue Ops Barge P305 continued through the night by #INSKochi & #INSKolkata. Offshore Support Vessel Energy Star & Great Ship Ahalya have joined the effort. 132 personnel rescued so far in extremely challenging circumstances.@DefenceMinIndia https://t.co/9fbs7g8STl
— SpokespersonNavy (@indiannavy) May 18, 2021
दुसरीकडे भारतीय नौसेने दिलेल्या माहितीनुसार, सागर भुषण या तेलविहीरीवर अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतचीसाठी आयएनएस तलवार घटनास्थळी गेली आहे. तिथे 101 कर्मचारी अडकले असल्याची माहिती मिळतेय. सोबतच लगतच्या बार्ज एस.एस 3 वर 196 जण अडकले आहेत. त्यांच्या बचावकार्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
Weather update : मान्सूनची वेगाने वाटचाल, तीन दिवसात अंदमानात धडकणार!
VIDEO | सोसाट्याच्या वाऱ्याने झाड घरावर पडलं, जिगरबाज आजोबांनी घाव झेलत नातवाला वाचवलं
Safe release of ONGC workers stranded at sea during Taukate cyclone