Video : टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : अमोल कोल्हे यांच्या मनात कमळ?, तो व्हिडीओ जोरदार व्हायरल
अमोल कोल्हे २०१४ मध्ये भाजपकडून लढणार का 2024 ला शिरुरमधूनच उभे राहणार का? या प्रश्नावर आधी शेतकरी आभाळ बघतो, वारं बघतो मगच...
मुंबई : खासदार अमोल कोल्हेंची भाजपशी जवळीक वाढलीय का, या प्रश्नावर कोल्हेंनी दिलेलं उत्तर व्हायरल होतंय. मात्र त्या व्हिडीओनंतर अशा कोणत्याही शक्यतांना कोल्हेंनी नकार दिलाय. अमोल कोल्हे २०१४ मध्ये भाजपकडून लढणार का 2024 ला शिरुरमधूनच उभे राहणार का? या प्रश्नावर आधी शेतकरी आभाळ बघतो, वारं बघतो. मगच शेत नांगरायला घेतो, असं उत्तर कोल्हेंनी दिल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्यायत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमोल कोल्हे लवकरच भाजपात जाण्याच्या चर्चा रंगल्या. मात्र नंतरहून कोल्हेंनीच या चर्चांना खोटं ठरवलं.
पाहा व्हिडीओ-
अमोल कोल्हेंच्या दाव्यानुसार मुद्दामहून आपल्या नाराजीच्या बातम्या पेरल्या जातायत. पण गेल्या वर्षभरातल्या घडामोडींमुळे कोल्हे खरोखर नाराज आहेत का, या बातम्यांना बळ मिळतंय. ऑक्टोबरमध्ये कोल्हेंनी अमित शाहांची भेट घेतली. ‘शिवप्रताप गरुडझेप’ सिनेमाच्या निमंत्रणासाठी भेट होती.
डिसेंबरमध्ये भाजपचे खासदार रावसाहेब दानवेंच्या जालन्यात अमोल कोल्हेंचा दौरा झाला. दानवेंचे भाऊ भास्कर दानवेंच्या बांधकाम कार्यालयाचं उद्घाटन कोल्हेंच्या हस्ते झालं. त्यानंतर रावसाहेब दानवे आणि कोल्हेंमध्ये अर्धा तास गुप्त चर्चाही झाली.
पिंपरीच्या पोटनिवडणुकीत स्टार प्रचारक असूनही कोल्हे गैरहजर राहिले, त्यामागे त्यांनी नियोजीत कार्यक्रमाचं दिलं. ऑक्टोबरमध्ये शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात कोल्हे गैरहजर होते, दाताच्या शस्रक्रियेचं कारण दिलं. 3 डिसेंबरला वादग्रस्त विधानांविरोधात रोहित पवारांनी संभाजीमहाराजांच्या समाधीस्थळी आंदोलन केलं.
कोल्हे गैरहजर राहिले, कारण नियोजीत दौऱ्याच दिलं. 10 जानेवारीला मुंबईत राष्ट्रवादीनं बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत गैरहजर, कारण नाशकातल्या कार्यक्रमाचं दिलं. मात्र जानेवारीतच शिंदेंनी संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या बैठकीत राष्ट्रवादीनं बहिष्कार टाकला होता, पण बहिष्कारानंतरही त्या बैठकीला अमोल कोल्हे हजर होते.
2019 ला अमोल कोल्हेंनी शिरुरमध्ये आढळरावांचा ५८ हजार मतांनी पराभव केला होता. कोल्हे राष्ट्रवादीकडून लढले…तर आढळराव शिवसेनेकडून. सध्या शिवसेना दोन गटात विभागली गेलीय. ज्या आढळरावांविरोधात कोल्हे लढले होते, ते आता शिंदे गटात आहेत. ज्या पक्षाकडून अमोल कोल्हे लढले. त्या राष्ट्रवादीच्या काही आमदारांची भाजपसोबत जवळीक वाढल्याची चर्चा आहे आणि स्वतः अमोल कोल्हे मात्र आधीच्या विधानात संकेत देत नंतर भाजप प्रवेशास नकार देतायत.