Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत शिव्या का देतात?
विधीमंडळाला चोर मंडळ म्हणून आधीच संजय राऊत अडचणीत आलेत. त्यातच आता त्यांनी निवडणूक आयोगालाही शिवीगाळ केलीय
मुंबई : विधीमंडळाला चोर मंडळ म्हणून आधीच संजय राऊत अडचणीत आलेत. त्यातच आता त्यांनी निवडणूक आयोगालाही शिवीगाळ केलीय. त्यामुळं आता पुन्हा राऊतांवर नव्या कारवाईची मागणी सुरु झालीय. पाहुयात.
संजय राऊत सध्या शिव्या देत सुटलेत, राऊतांनी आधी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटलं. आता निवडणूक आयोगालाच राऊतांनी शिवीगाळ केलीय.
शिवसेना आणि धनुष्यबाणाचं चिन्हं निवडणूक आयोगानं शिंदेंना दिलं आणि त्यावरुन टीका करताना सांगलीत राऊतांनी, निवडणूक आयोगाचा बाप काढत शिवीगाळ केली. त्यावरुन पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, पण राऊतांनी होऊ द्या व्हायरल असं म्हटलंय.
विधीमंडळाला चोर मंडळ म्हटल्यावरुन, आधीच राऊतांवर हक्कभंगाच्या कारवाईची तलवार आहे. पण आता पुन्हा निवडणूक आयोगाला शिवी दिल्यानं राऊतांच्या विरोधात विधानसभेत संताप उमटला. संजय राऊतांच्या तोंडी आताच शिवराळ भाषा आली असं नाही. तर याआधी त्यांनी ऑन कॅमेरा नारायण राणे आणि सोमय्यांबद्दल शिवराळ भाषा वापरलीय.
आधीच राऊतांच्या चोरमंडळ या वक्तव्यावरुन, हक्कभंगावरुन राऊतांविरोधात कारवाई सुरु झालीय. विधीमंडळात हक्कभंग समितीची बैठकही झाली आणि बजावलेल्या नोटीसवरुन वेळ संपली..तरी राऊतांनी नोटीसला उत्तरही दिलेलं नाही.
दरम्यान, राऊतांच्या बोलण्यावरुन स्पष्ट दिसतंय की, हक्कभंगाच्या कारवाईला समोरं जाण्यास त्यांची तयारी आहे…पण त्याचवेळी निवडणूक आयोगाला शिवीगाळ केल्यानंही आता अडचणीत भर पडू शकते…