Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट | ठाण्यात नेमकं झालंय तरी काय? मातोश्रीहून संपूर्ण ठाकरे कुटुंब हॉस्पिटलमध्ये झालं होतं दाखल

ठाण्यात एका फेसबुक पोस्टवरुन मारहाण झाली. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप, ठाकरे गटानं केला. त्यानंतर उद्धव ठाकरे थेट ठाण्यात आलेत. ठाण्यात नेमकं काय घडलंय? पाहा टीव्ही9चा मराठीचा स्पेशल रिपोर्ट.

Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट | ठाण्यात नेमकं झालंय तरी काय? मातोश्रीहून संपूर्ण ठाकरे कुटुंब हॉस्पिटलमध्ये झालं होतं दाखल
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 11:48 PM

मुंबई : ठाण्यात एका फेसबुक पोस्टवरुन मारहाण झाली. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप, ठाकरे गटानं केला. त्यानंतर उद्धव ठाकरे थेट ठाण्यात आलेत. ठाण्यात नेमकं काय घडलंय? पाहा टीव्ही9चा मराठीचा स्पेशल रिपोर्ट.

ठाण्यात फेसबुक पोस्टवरुन झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचलाय. मारहाण झालेली महिला ही ठाकरे गटाची असून, शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप आहे. संध्याकाळी ऑफिसच्या आवारात, मारहाण केली असून पोटावर लाथ मारली असा आरोप ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांनी केलाय. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. मात्र हा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं फेटाळलाय.

आता मारहाणीचं प्रकरण ज्या पोस्टवरुन सुरु झालं. ती रोशनी शिंदेंची फेसबुक पोस्ट काय होती, तेही पाहुयात. काल ठाण्यात रॅली कव्हर करणाऱ्या पत्रकाराला एका प्रवक्त्याने धमकी दिली आणि दुसऱ्याने बाहेर न निघण्यास सांगितलं.

दिघे साहेब असते तर त्यांनी काय केलं असतं. ते सर्वांना माहिती आहे. नुसतं आनंद मठ नावावर करुन काही होत नसतं. मात्र आपण या पोस्टवरुन सॉरीचाही मेसेज पाठवला. तरीही शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप रोशनी शिंदेंचा आहे. तर समज देण्य़ासाठी गेले असताना रोशनी शिंदेंनीच शिवीगाळ केली. त्यामुळं मारहाण नाही तर समजवण्याचा प्रयत्न केला असं शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदेंनी म्हटलंय.

मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर बातमी, वाऱ्यासारखी पसरली. मातोश्रीहून स्वत: उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे ठाण्यात आले आणि हॉस्पिटलमध्ये रोशनी शिंदेंची विचारपूस केली. ठाण्यात महिलांची गँग तयार झालीय का?, असा सवाल करतानाच ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनाही इशारा दिलाय.

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.