मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील (Congress Crisis) पडझड रोखण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. मात्र मागे काही राज्यांच्या निवडणुकी पार पडल्या त्यातही काँग्रेसच्या (Congress) हाती फार काही लागलं नाही. त्यामुळे काँग्रेसकडून राजस्थानमध्ये राष्ट्रीय पातळीवरचं एक शिबीरही घेण्यात आले. या शिबिरात काँग्रेसने काही नवे संकल्प केल्याच्या बातमम्याही माध्यमांपर्यंत आल्या. मात्र आज काँग्रेसची विधान परिषदेची यादी पहिल्यास राजस्थानमध्ये जे ठरलं ते कुठं गेलं? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे. आज जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपले विधान परिषदेसाठीचे पत्ते ओपन केले आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसचीही यादी आली. काँग्रेसकडून यावेळी विधान परिषदेवर भाई जगताप (Bhai Jagtap) आणि चंद्रकांत चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आजच्या उमेदवार यांदीनंतर राजस्थानमधील काँग्रेसच्या शिबिरानंतरची पृथ्वीराज चव्हाणांची वक्तवं अनेकांना आठवू लागली आहेत.
काँग्रेसची आजची ही यादी पाहिल्यास काँग्रेसचं पुन्हा “हसते हसते पुराने रस्ते” असाच सूर असल्याचे बोललं जात आहे. युवा उमेदवारांना, नव्या चेहऱ्यांना, महिलांना उमेदवरांना संधी देण्याचा काँग्रेसचा संकल्प हा असा कसा? असा सवाल आता विचारण्यात येत आहे. कारण भाई जगताप आणि हंडोरे यांच्या दोघांच्याही वयाचा विचार केला तर युवा चेहरा कुठे आहे? असा सहाजिकच सवाल उपस्थित केला जात आहे.
भाई जगताप यांना उमेदवारी मिळाल्याने आता या उमेदवारीमागील कारणमिमांसा काही राजकीय पंडितांकडून करण्यात येत आहे. यात काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाई जगताप यांना संधी दिली असावी. तसेच भाई जगताप यांना सुरूवातीपासूनच मुंबई काँग्रेसमधील आक्रमक चेहरा म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळही त्यांच्याच गळ्यात पडली. आता त्यांचं राजकीय वजन वाढवल्यास काँग्रेसला येत्या महापालिका निवडणुकीत त्याचा नक्कीच फायदा होईल, असा तर्क काही राजकीय पंडित लावत आहेत.
काँग्रेसने या दोन्ही उमेदवारी देण्यामागे प्रमुख कारण ही मुंबई महापालिकेची निवडणूकच आहे, असे तर्क लावले जात आहेत. तसेच यात ओबीसी चेहरे आणि पक्षातील समतोल याकडेही यावेली काँग्रेसने लक्ष दिल्याच्या चर्चा आहेत. आता काँग्रेसची ही यादी बरीच सरप्राईज देणारी असली तरी आगामी महापालिका निवडणुका आणि काँग्रेसचं संघटन यावर याचा किती परिणाम होतो हे येणारा काळच सांगेल. आज उमेदवाऱ्या जाहीर झाल्याने अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे.