Vidhan Parishad Election : “अब की बार” आम्हीच आमदार, शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवींनी उमेदवारी अर्ज भरला, तर भाजपकडून…

यावेळी विधान परिषदेवर शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना संधी देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे गेली विधानसभेची निवडणूक वरळीतून लढल्याने सचिन अहिर यांची अडचण झाली होती. त्यामुळे आता संधी मिळताच त्यांचे राजकीय पुर्वसन करण्यात आले आहे.

Vidhan Parishad Election : अब की बार आम्हीच आमदार, शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवींनी उमेदवारी अर्ज भरला, तर भाजपकडून...
शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवींनी उमेदवारी अर्ज भरला,
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 08, 2022 | 3:46 PM

मुंबई : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीनेच (Rajyasabha Election) अफाट हवा केली असतानाच विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election)जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या. त्यानंतर लगेच उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली आहे. शिवसेनेकडूनही आपली दोन्ही नावं विधान परिषदेसाठी जाहीर करण्यात आली. तर लगेच उमेदावारी अर्ज भरण्याचीही लगबग सुरू झाली. शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही उमेदवरांनी आपले उमेदवारी अर्ज हे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत  भरले आहेत. यावेळी विधान परिषदेवर शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना संधी देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे गेली विधानसभेची निवडणूक वरळीतून लढल्याने सचिन अहिर यांची अडचण झाली होती. त्यामुळे आता संधी मिळताच त्यांचे राजकीय पुर्वसन करण्यात आले आहे. तर भाजपच्या उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात केली आहे. भाजपकडून निघालेली उमेदवारांची यादी मात्र अनेकांसाठी सरप्राईजिंग होती.

आतापर्यंत कुणाचे उमेदवारी अर्ज दाखल?

  1. सचिन अहिर, शिवसेना
  2. आमशा पाडवी, शिवसेना
  3. राम शिंदे, भाजप
  4. प्रसाद लाड, भाजप

प्रसाद लाड उमेदवारी अर्ज दाखल करताना

काँग्रेसकडून दोन नावं जाहीर

  1. भाई जगताप, काँग्रेस
  2. चंद्रकांत हंडोरे, काँग्रेस

आमशा पाडवी काय म्हणाले?

यावेळी आपल्या उमेदवारीवर प्रतिक्रिया देताना आमशा पाडवी म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर ती मोठी जबाबदारी दिली ती पूर्ण जबाबदारीने पार पाडेन. तीन पट ताकदीने आम्ही पुढे जाऊ, विधान परिषद स्थापन झाल्यापासून एकाही आदिवासी व्यक्तीला संधी दिली  नव्हती. आता पहिल्यांदा आदिवासी व्यक्तीला संधी दिली मिळाली आहे, मी उद्धव ठाकरे यांचा विश्वास सार्थ करून दाखवेन, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.

सचिन अहिर यांची प्रतिक्रिया

तर सचिन अहिर आपल्या उमेदवारीबाबत बोलताना म्हणाले, हे श्रद्धा आणि सबुरीचे फळ आहे. राजकारणात उद्धव ठाकरेंनी मला एक शब्द दिला होता, तो खरा करून दाखवला आहे. आता नवीन झेप सुरू होत आहे. खूप जबाबदारीने विश्वास ठेवला आहे. त्यामुळे पक्षासाठी काम करणार, मुंबई, महाराष्ट्र, पुणे, तसेच इतर शहरी भागाततील प्रश्न सोडवू, प्रत्येकाचा रोल ठरला आहे. राज्याचे प्रश्न सर्वोच्च सभागृहात मांडले जायला हवे, कामगारांबाबत काय धोरणं ठरवता येतील? याबाबतही आम्ही विचार करून अशी प्रतिक्रिया यावेळी सचिन अहिर यांनी दिली आहे.

भाजपकडून राम शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल

तर भाजपकडून यावेळी अनेक बड्या नावांना धक्का देत उमेदवारी देण्यात आल्या आहेत. त्यात भाजप नेते राम शिंदे यांनाही संधी मिळाली आहे. त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. पक्षाने माझ्यावर विश्वास दर्शवला आहे, तो सार्थ करून दाखवेन अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.