Vidhan Sabha Election 2024 : घोडा मैदान तर अगदी जवळ; जयंत पाटील यांनी सांगितली विधानसभा निवडणुकीची तारीख

Jayant Patil Declared Election Date : लोकसभा निवडणुकीतून उसंत मिळत नाही तोच राज्याला विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा अनुभव येणार आहे. महाविकास आघाडीचे मनोबल वाढलेले आहे, त्यातच जयंत पाटील यांनी तर विधानसभेची तारीखच बोलता बोलता जाहीर केली आहे.

Vidhan Sabha Election 2024 : घोडा मैदान तर अगदी जवळ; जयंत पाटील यांनी सांगितली विधानसभा निवडणुकीची तारीख
अन् जाहीर केली विधानसभेची तारीख
Follow us
| Updated on: Jun 26, 2024 | 4:23 PM

राज्यात लोकसभेच्या तोफा थंडावून फार दिवस झाले नाही, तोच आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभेत महाविकास आघाडीने मोठा उलटफेर केला आहे. महायुतीच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. महाविकास आघाडीच्या मुसंडीने सध्या महायुतीत धुसफूस पाहायला मिळत आहे. अजितदादा पवार गटांविरोधात महायुतीत नाराजी दिसून येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे मनोबल वाढलेले आहे. त्यातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर विधानसभा निवडणुकीची तारीख पण जाहीर केली आहे. मग कधी उडणार विधानसभा निवडणुकीचा बार?

जनतेने सर्वांना व्यवस्थित जागा दाखवली

मुख्यमंत्री पदी कोण याविषयात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वारस्य दाखवू नये. आज कोणत्या नेत्याने या विषयीचे नाव जाहीर करणं टाळलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या देशाने २१० लाख कोटी रुपयांचे कर्ज उभे केले आहे. श्रीलंका सारखी परिस्थिती होण्या आधी काम काम करायला हवे. आमदार सांभाळायला टेंडर काढले आहे की यांना खूप वर्ष लागतील. हे आमदार केवळ घोषणा करतात.नारळ फोडणे आणि कमिशन घेणे हेच त्यांचे काम असल्याचा टोला त्यांनी हाणला.

हे सुद्धा वाचा

जागा वाटपासंबंधी लवकरच बैठक

जागा वाटपाची चर्चा काल होणार होती मात्र आमची काल बैठक असल्यामुळे झाली नाही लवकरच ती बैठक होईल. तिन्ही पक्ष एकत्रित बसून ठरवू की किती जागा पाहिजे. तुतारी आणि पिपाणी या चिन्हामुळे गोंधळ झाला आणि दिंडोरी लोकसभेमध्ये आमची एक लाखापेक्षा अधिक मदत तिकडे गेली त्यामुळे निवडणूक आयोगाने याच्यावर विचार केला पाहिजे. आमच्या पक्षाकडे नवीन चेहरे तरुण मुलं आणि नवीन कार्यकर्ते यायला लागलेले आहेत त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचा विचार करून आम्ही योग्य तो विचार करू, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

अन् जाहीर केली विधानसभेची तारीख

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विविध विषयावर त्यांची मते मांडली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि निवडून आलेले आमदार विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्री कोण होईल ते ठरवतील, असे ते म्हणाले. इतर पक्षांचा विचार करून सर्व निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान बोलता बोलता त्यांनी 20 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार असल्याचे भाकित केले. आमचं सरकार येईल त्यावेळी यांच्या पेक्षाही उत्तम योजना आम्ही राबवू, असे आश्वासन त्यांनी दिले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.