Sharad Pawar : शरद पवार यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणता? कोणी कोणताही अंदाज बांधा, या दिग्गज नेत्यावर भरवसा, असा केला खुलासा

Sharad Pawar On Maharashtra CM : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल यावर राजकीय रवंथ करून झाला आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा काही समोर आणला नाही. दरम्यान इस्मालपूर येथे बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबतचे मोठे संकेत दिले आहेत.

Sharad Pawar : शरद पवार यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणता? कोणी कोणताही अंदाज बांधा, या दिग्गज नेत्यावर भरवसा, असा केला खुलासा
शरद पवार
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 12:36 PM

राज्यात विधानसभेचा बिगुल वाजला, पण महायुती अथवा महाविकास आघाडीने पुढील मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नाही. सध्याची राजकीय अपरिहार्यता त्यासाठी कारणीभूत असेल. दोघांकडे उमेदवार आणि इच्छुक नाहीत असे नाही. पण या निवडणुकीत दोन्ही गट विना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घेऊन मताचा जोगवा मागणार आहे. अर्थात अनेक जण गुडघ्याला बाशिंग लावून आहेत. पण जोपर्यंत विधानसभेचा निकाल हाती येत नाही. तडजोडीचे, कुरघोडीचे राजकारण होत नाही. तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होणार नाही, हे निश्चित आहे. दरम्यान इस्मालपूर येथे बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबतचे मोठे संकेत दिले आहेत.

लाडकी बहीण योजनेवरुन अजित दादांवर टीका

लाडकी बहीण योजनेवरून शरद पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला. लाडकी बहीण योजना आम्ही काढली असं बोललं जातं आहे. बहि‍णीच्या साठी सन्मानासाठी कोणाच्या काळात निर्णय झाले, असा प्रश्न त्यांनी केला. स्त्रियांना 50 टक्के आरक्षण देण्याची सुरूवात केली. माझी भगिनी सरपंच पासून महापौर झाली. सन्मान देण्याचं आठवण केली तर मी घेतलेला निर्णय आजपर्यंत टिकलेला आहे. सन्मान करायचा तर तो टिकाऊ असला पाहिजे. लाडक्या बहि‍णीच्या नावानं काही रक्कम ठेवलेली आहे. सन्मान करायचा तो टिकाऊ असला पाहिजे. लोकसभेतील पराभवानंतर लाडकी बहीण योजना आठवली, अशी टीका त्यांनी केली. स्त्रियांवरील अत्याचार वाढले आहेत. सासवड घाटात चार नराधमांनी अत्याचार केला. चार वर्षाच्या बालिकांवर अत्यचार केलेलं आहे. यांच्या हातात सत्ता ठेवायची नाही असा निकाल भावांनी दिल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र हितांची जपणूक महत्त्वाची

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण भूमिका मांडली. वसंत दादांनी त्यासाठी कष्ट केलेलं आहेत. अधिक लक्ष यावेळी केद्रीत केलेलं होतं. ख-या अर्थानं महाराष्ट्र हितांची जपणूक हा विषय राहिलेला आहे. एक क्षेत्र असं नाही दक्षिणेच्या राज्यांशी तुलना केली तर महाराष्ट्र खालच्या पातळीवर आहे, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राला पुर्ण स्थितीत आणायचा काम आपल्या सगळ्यांना करायचा आहे. निवडणुकीच्या कालखंडात जनमत तयार कऱण्याची जबाबदारी आपली आहे. हा सर्व परिसर ऐतिहासिक परिसर आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जयंत पाटलांना जायचं आहे. महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात फिरत असताना तुम्हा सगळ्यांना हे काम करावं लागणार आहे. या संपूर्ण कामाला तुमच्या शुभेच्छा आहे. उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी ही कारवाई होणार आहे. पक्षाचा देशातील म्हणून प्रमुख्य सांगतो साखळ गावातून उद्या महाराष्ट्र घडवण्याची सुरूवात होणार आहे.

जयंत पाटील यांना मोठी संधी

शरद पवारांकड़ून मविआची सत्ता आल्यास जयंत पाटील यांना मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सांभाळण्याची आणि पुढे नेण्याची दृष्टी आणि शक्ती जयंत पाटलांमध्ये आहे, असे मोठे वक्तव्य शरद पवार यांनी केले. महाराष्ट्रातील सुपुत्राच्या हाती महाराष्ट्राची उभारण्याची सावरण्याची महाराष्ट्र पुढं नेण्याची जबाबजदारी टाकणार आहे. महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील. शिवछत्रपती यात्रा करण्याची नोंद महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोक घेतल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला. शरद पवारांकडून जयंत पाटलांच्या सीएम पदाचे संकेत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व सहमतीने जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होते की काय हे अवघ्या दीड महिन्यात स्पष्ट होईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.