विधानसभेसाठी इच्छुकांची अलोट गर्दी; शरद पवारांवर कार्यकर्त्यांचा जबरदस्त विश्वास, 1200 उमेदवारांपैकी कुणाला लॉटरी लागणार? 

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांचा पाऊस पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभेला 85 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. आता कुणाला लॉटरी लागणार हे लवकरच समोर येईल.

विधानसभेसाठी इच्छुकांची अलोट गर्दी; शरद पवारांवर कार्यकर्त्यांचा जबरदस्त विश्वास, 1200 उमेदवारांपैकी कुणाला लॉटरी लागणार? 
कुणाला लागणार शरद पवार गटाकडून लॉटरी?
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 4:05 PM

विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात नशीब आजमावणाऱ्यांची संख्या कमी नाही. सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून काहींचे देव पाण्यात आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची रीघ लागली आहे. अर्जांचा पाऊस पडला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून इच्छुकांनी उमेदवारासाठी थोरल्या पवारांना साकडं घातलं आहे. या उमेदवारांकडून एक खास बाँड पण लिहून घेण्यात आला आहे. त्याची जोरदार चर्चा आहे. काय आहे हा बाँड? कोणत्या भागातील उमेदवारांनी पवार गटाकडून लढण्यासाठी केले सर्वाधिक अर्ज?

1200 इच्छुक उमेदवारांचे अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभेला 85 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. 85 ते 90 जागांसाठी 1200 इच्छुक उमेदवारांचे पक्षाकडे अर्ज प्राप्त झाले आहे. राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाट्याला येणाऱ्या राखीव जागांसाठी जास्त अर्ज आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये मोहोळ, फलटण, दिंडोरी, उदगीर, भुसावळ, मेहकर, मूर्तिजापुर, उमरेड, शहापूर, अंबरनाथ, माळशिरस विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

देवळाली विधानसभेसाठी सर्वाधिक अर्ज

आज अखेर एकूण 1350 उमेदवारी अर्ज आले आहेत. सगळ्यात जास्त देवळाली विधानसभा मतदारसंघात अर्ज आले आहेत. देवळाली मतदारसंघात 38 जणांनी अर्ज केले आहेत. नवाब मलिक यांच्या मतदारसंघात अणुशक्तीनगर विधानसभेत 9 जण इच्छुक आहेत तर मंत्री अनिल पाटील यांच्या अमळनेर विधानसभा मतदारसंघात 13 जण इच्छुक आहेत. राज्यातील इतर मतदारसंघातून पण अनेक उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. यावेळी चार पक्ष, अपक्ष आणि छोटे पक्ष मिळून अनेक उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात असतील.

बाँडची राज्यभर चर्चा

इच्छुक उमेदवारांपैकी काही जणांनी थेट 100 रुपयांच्या बाँड पेपर उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढणार नसल्याचं आश्वासन लिहून दिलं आहे. उमेदवारांनी बाँडवर प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. राज्यातील 288 जागांपैकी कोणत्याही जागेसाठी आपल्या नावाचा विचार करण्यात आला नाही तर आपण बंडाळी करणार नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढणार नाही. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा देईल, असे उमेदवारांनी बाँडवर लिहून दिले आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.