सात तास ‘वेट’ अखेर शिवतारे आणि मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

लोकसभा निवडणुकीआधी बारामती मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत होणार असताना शिंदे गटाचे विजय शिवतारेंनी पण रणशिंग फुंकलं आहे. महायुतीसाठी ही धोक्याची घंटा असल्याची चर्चा होत असताना शिवतारे यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली आहे.

सात तास 'वेट' अखेर शिवतारे आणि मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 9:55 PM

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. नणंद आणि भावजय यांच्यात ही निवडणुक होणार आहे. मात्र दोन्ही पवारांना पराभूत करण्यासाठी शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनीही दंड थोपटले आहेत. महायुतीमध्ये असुनही त्यांनी उघडपणे पवार यांना आव्हान देणार असल्याचं सांगितलं. याच पार्श्वभूमीवर शिवतारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला आले होते. मात्र त्यांना तब्बल सात तास वाट पाहावी लागली पण त्यांनी भेट घेतलीच. या भेटीमध्ये काय चर्चा झाली याबाबत विजय शिवतारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

विजय शिवतारे काय  म्हणाले?

मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. माझ्यासह जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य, नगरसेवक, मोठे पदाधिकारी, जिल्हा आणि तालुका प्रमुखांसह 150 पदाधिकारी आले. आम्ही सर्वांना मिळून एकनाथ शिंदे यांना समजावलं, हा त्रास आमच्याकडे आहे. माझी भावना काय आहे ती आम्ही मुख्यमंत्र्यांना कळवली. याबाबत दोन दिवसानंतर परत एकदा मीटिंग होईल. दोन दिवस शांत राहणार आहोत कारण त्यांना काय कोणाशी काही चर्चा करायची असेल पण दोन दिवसानंतर परत एकदा मुख्यमंत्र्यांशी मोजक्याच लोकांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं विजय शिवतारे यांनी सांगितलं.

विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष राज्याला माहित आहे. विधानसभा निवडणुक 2019 मध्ये अजित पवारांनी शिवतारेंना निवडणुकीअगोदर कसा निवडून येतो ते पाहतो, असं आव्हान दिलं होतं. या निवडणुकीमध्ये शिवतारे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र आता राजकीय समीकरण बदलली आहेत.

विजय शिवतारे हे शिंदे गटात आहेत, तर महायुती असल्याने आता अजित पवार आणि विजय शिवतारे यांना एकत्र यावं लागलं. परंतु निवडणुकीमध्ये आपण लढणार असल्याचं शिवतारे म्हणाले होते. इतकंच नाहीतर त्यांनी तिकीट मिळालं नाहीतर आपण अपक्ष लढणार आहोत, असं म्हटलंय. त्यामुळे आता दोन दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.