Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC Reservation: उद्या ओबीसींचे आरक्षण गेले तर ठाकरे सरकारला जबाबदार धरू नये: विजय वडेट्टीवार

सहा राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे. केंद्र सरकारने एक पाऊल टाकून सरसकट 27 टक्के आरक्षण दिले तर प्रश्न सुटू शकतो. पंतप्रधान महोदय आम्हाला न्याय द्या ही मागणी ही आम्ही करणार आहोत. इम्पिरिकल डेटा कोरोना असल्याने गोळा करता आला नाही.

OBC Reservation: उद्या ओबीसींचे आरक्षण गेले तर ठाकरे सरकारला जबाबदार धरू नये: विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 6:52 PM

मुंबई: सहा राज्यात ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) प्रश्न उभा राहिला आहे. केंद्र सरकारने (central government) एक पाऊल टाकून सरसकट 27 टक्के आरक्षण दिले तर प्रश्न सुटू शकतो. पंतप्रधान महोदय आम्हाला न्याय द्या ही मागणी ही आम्ही करणार आहोत. इम्पिरिकल डेटा कोरोना असल्याने गोळा करता आला नाही. कोरोना काळात माणसे वाचविणे गरजेचे होते. 2 वर्ष जग थांबले होते. अशावेळी कुठून इम्पिरिकल डेटा गोळा करता येईल? मध्यप्रदेशात ओबीसींचा कायदा कसा टिकला? तसा कायदा करण्याची आमची तयारी आहे. मध्यप्रदेशाने अजून इम्पिरिकल डेटा गोळा करायला सुरुवात केलेली नाही. उद्या ओबीसी आरक्षण गेले तर ठाकरे सरकारला जबाबदार ठरवू नये. गेले तर सगळ्या राज्यातील ओबीसींचे आरक्षण जाईल, अशी भीती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी व्यक्त केली आहे.

आयोगाला फक्त डेटा गोळा करण्याचच काम दिलं

राज्याने केलेला कायदा इम्पिलिमेंट होणं आवश्यक होतं. कायदा करूनही त्याची अंमलबजावणी होण्यात आम्हाला यश मिळालं नाही. इथे सुद्धा यश मिळालं नाही. खरेतर इम्पिकल डेटा गोळा करण्यासाठी आयोगाला दुसरं कोणतंही काम दिलं नव्हतं. या आयोगाला केवळ आणि केवळ डेटा गोळा करण्यासाठी काम दिलं होतं. त्याच्यापलिकडे काम दिलं नाही. आयोग नेमत असताना गोंधळ झाला असं म्हटलं गेलं. त्यात काही तथ्य नाही. आम्ही केवळ आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाला नेमायचं याची मागणी करतो. उच्च न्यायालय आयोगाच्या अध्यक्षाचं नाव पाठवतं. कोणतं नाव त्यांनी पाठवावं हा अधिकार कोर्टाचा असतो. आमची चॉईस नसते. त्यांनी नाव दिलं. बाकीच्या नेमणूक आयोगाने नियमानुसार केल्या. त्यात माजी निवृत्त न्यायाधीश, हायकोर्टातील वकील, प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यात राजकीय पदावर काम करणारा एकही व्यक्ती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ओबीसी आरक्षणात माझा रोल नाही

ओबीसी आरक्षणात माझा कुठेही रोल येत नाही. वकील नेमण्याचा अधिकार मला नाही. माझ्या खात्याचा प्रश्नही येत नाही. ओबीसी व्हिजेएनटी समाजाच्या ज्या योजना आहेत, त्याची अंमलबजावणी करणे एवढंच माझ्याविभागाशी संबंधित आहे, असं सांगतानाच मी ओबीसाचा घटक म्हणून लढत आहे. मंत्री म्हणून नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. ओबीसी आरक्षणाबाबतचा न्यायालयाचा निकाल वेदनादायी आहे. ओबीसी समाजाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारा हा निकाल आहे. ओबीसी आरक्षण कसे वाचेल यावर विधानसभेत चर्चा व्हायला हवी होती. पण याचे राजकारण झाले. ओबीसी मंत्री म्हणून माझीच ही जबाबदारी होती हे काहींनी सांगितले. ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा ग्रामीण विभाग, शहर विभाग, वित्त विभाग, न्याय विभाग सांभाळत आहे. त्याच्याशी माझा संबंध नाही. पण काही लोकांचा गैरसमज झाला आहे, असंही ते म्हणाले.

जातीनिहाय जनगणनेशिवाय आरक्षण देणं अशक्य

मध्यप्रदेशातही ओबीसी आरक्षणासाठी आंदोलने झाली. राज्यातही आंदोलने झाली. पण आम्ही लाठीचार्ज केला नाही, असं सांगतानाच पूर्णतः जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही. 2014 ते 2019 पर्यंत आताच्या विरोधकांची सत्ता होती. त्यांनी का आरक्षण दिलं नाही? असा सवाल त्यांनी केला. ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यात तोडगा काढला जाणार आहे. विरोधी पक्षांनी काही सूचना केल्या आहेत त्याचा ही विचार आम्ही करत आहोत. घटनेनुसार निवडणुका कार्यकाळ अधिक वाढवता येत नाही. पण मध्यप्रदेशमध्ये निवडणुकांचा कालावधी वाढवण्याचा अधिकार कसा मिळाला याची माहिती घेतली जात आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

फडणवीस आरक्षणावर बोलतात, राज्यपाल महात्मा फुलेंवर टीका करतात, ही दुटप्पी भूमिका; अमोल मिटकरी यांचे टीकास्त्र

VIDEO: मुख्यमंत्र्यांशी अनेक विषयावर चर्चा, दृश्यफळे लवकरच दिसतील; संजय राऊतांचा सूचक इशारा

VIDEO: प्रसंगी पालिका, जिल्हा परिषद, पंचायतीवर प्रशासक नेमू, पण ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही, अजितदादांची ग्वाही

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.