विक्रोळीतील नाल्यात मृतदेह सापडला, ओळख पटवण्याचे प्रयत्न

विक्रोळीत टागोरनगर भागात ग्रुप नंबर सहामध्ये असलेल्या नाल्यात हा मृतदेह सापडला. (Vikroli Man Dead Body found)

विक्रोळीतील नाल्यात मृतदेह सापडला, ओळख पटवण्याचे प्रयत्न
विक्रोळीतील नाल्यात मृतदेह सापडला
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 3:13 PM

मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) मृत्यू प्रकरण ताजं असतानाच मुंबईतील नाल्यात आणखी एक मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. विक्रोळी परिसरातील नाल्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. (Vikroli Man Dead Body found)

विक्रोळीत टागोरनगर भागात ग्रुप नंबर सहामध्ये असलेल्या नाल्यात हा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह नाल्यातून बाहेर काढला आहे. मात्र तो कोणाचा आहे, तो तिथे कसा आला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.

आत्महत्या, हत्या की अपघात?

नाल्यात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. ही आत्महत्या आहे, हत्या, घातपात की अपघात याचा तपास पोलीस करत आहेत.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा दहा दिवसांपूर्वी मृतदेह सापडला होता. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्यादिवशी मुंब्रा रेतीबंदर परिसरात सापडला, त्यादिवशी म्हणजे 5 मार्च रोजी पहाटे खाडीला भरती होती. मात्र, त्यानंतर दिवस उजाडताच ओहोटी सुरु झाली आणि त्यामुळेच मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण 4 आणि 5 मार्चच्या भरती आणि ओहोटीच्या वेळा टीव्ही-9 मराठीच्या हाती आल्या आहेत.

इचलकरंजीतही मृतदेह आढळला

दरम्यान, इचलकरंजीतील पर्वती इंडस्ट्रीसमोरही एका युवकाचा मृतदेह आढळला आहे. संगमनगर खोतवाडीजवळ आमीन लवाल या तरुणाचा मृतदेह सापडला. कालच त्याच्या मित्रांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. अमीनच्या मृतदेहावर मारल्याचे वळही आहेत. तरीही हा घातपात आहे, की अपघात की आत्महत्या, हे अद्याप स्पष्ट नाही.

संबंधित बातम्या :

मनसुख हिरेन यांचा मृतदेह भरतीवेळी टाकला, ओहोटीमुळे सापडला? नाट्य रुपांतरणात काय काय समोर?

(Vikroli Man Dead Body found)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.