होऊ दे अटक, पण बायकोसाठी कायपण! मुंबई विमानतळावर पठ्ठ्याने लावलं खतरनाक डोकं, नेमकं काय प्रकरण?

पतीने जेलची हवा खालली पण हार नाही मानली, बायकोसाठी त्याने जे काही केलं त्याने सर्वांनाचा धक्का बसला आहे. कारण कितीही प्रेम असलं तरी सहजासहजी कोणीही असं धाडस करत नाही. मात्र एक पती याला अपवाद ठरला आहे. नेमकं काय आहे जाणून घ्या.

होऊ दे अटक, पण बायकोसाठी कायपण! मुंबई विमानतळावर पठ्ठ्याने लावलं खतरनाक डोकं, नेमकं काय प्रकरण?
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 8:58 PM

मुंबई : पत्नीच्या इच्छेखातर किंवा प्रेमापोटी पतीने काहीतरी अजब गजब गोष्टी केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. अशाच प्रकारची एक घटना मुंबई विमानतळावरून समोर आली आहे. आपल्या पत्नीसाठी त्याने असं काही केलं की त्याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला दोन दिवस जेलची हवासुद्धा खावी लागली. विलास बाकडे असे या पतीचं नाव आहे. नेमकं या पतीने बायकोसाठी असं काय केलं ज्यामुळे जेलमध्ये जावं लागलं.

काय आहे नेमकं प्रकरण?

आरोपीची विलास बाकडे याची पत्नी काही कमानिमित्त मुंबईत आलेली होती. मात्र पुन्हा बंगळूरूला जाण्यास आकसा एअरलाईंसची फ्लाईट घेणार होती. मात्र जायला उशिर झाल्याने तिने आपल्या पतीला फोन करत याची माहिती दिली. विलास याने जास्तीचं डोकं लावलं त्याने अकासा एअरलाईन्सच्या कंट्रोल रूमला एक फोन केला ज्याने खळबळ उडाली.

काय केला फोन?

विलास बाकडे याने फोन करत विमानात बॉम्ब असल्याची धमकी दिली. बॉम्ब असल्याचा फोन आल्याने सगळेच हादरले. कारण विमानामध्ये एकूण 167 प्रवासी होते. स्थानिक गुन्हे शाखेचे बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी आले. संपूर्ण विमानाची तपासणी केली. मात्र विमानामध्ये त्यांना काहीच सापडलं नाही. शेवटी रात्री दीड वाजता विमान बंगळुरूच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी विलास याच्या धमकीच्या फोनची माहिती दिली.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी आपली सूत्र हलवली आणि बेंगळुरूमधून विलास बाकडे याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने कबूल केलं. बायकोला पोहोचायला उशिर झाला होता, प्लाईला उशिरा व्हावा यासाठी त्याने हा धमकीचा फोन केल्याचं सांगितलं. न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. आता आरोपी विलास बाकडे याला जामीन मंजूर झाला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.