सिंधुदुर्गात 9 वर्षात 7 जणांची हत्या, राऊतांचा राणेंवर भयंकर आरोप, जुनी थडगी उकरली जाणार; थेट गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आमच्यावर केलेले आरोप निराधार आहेत. त्यांच्या आरोपांची दखल घ्यावी असे वाटत नाही. पण राणेंना वाढत्या वयामुळे विस्मरण होत असेल. मुलांच्या उपदव्यापामुळे त्यांना स्मरणात राहत नसेल तर त्यांना त्यांचा भुतकाळ सांगावा लागेल.

सिंधुदुर्गात 9 वर्षात 7 जणांची हत्या, राऊतांचा राणेंवर भयंकर आरोप, जुनी थडगी उकरली जाणार; थेट गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
सिंधुदुर्गातील आजवरच्या राजकीय हत्यांची चौकशी करा; विनायक राऊत उद्या गृहमंत्र्यांना भेटणार
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 3:58 PM

मुंबई: केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी आमच्यावर केलेले आरोप निराधार आहेत. त्यांच्या आरोपांची दखल घ्यावी असे वाटत नाही. पण राणेंना वाढत्या वयामुळे विस्मरण होत असेल. मुलांच्या उपदव्यापामुळे त्यांना स्मरणात राहत नसेल तर त्यांना त्यांचा भुतकाळ सांगावा लागेल. सिंधुदुर्गात (sindhudurga) गेल्या नऊ वर्षात अनेक माऱ्यामाऱ्या झाल्या. खंडण्या उकळल्या गेल्या. मंचेकर, गोवेकर, सत्यविजय भिसे यांचा निर्घृणपणे खून कोणी केला? हे खून कोणी पचवले? श्रीधर नाईकच्या (shridhar naik) खुनात आरोपी कोण होतं? आम्हाला उघड करायला लावू नका, असा इशारा देतानाच सिंधुदुर्गात गेल्या नऊ वर्षात सात राजकीय हत्या झाल्या आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची उद्या आम्ही भेट घेणार आहोत. त्यांना या राजकीय हत्यांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत, असं शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सांगितलं.

शिवसेना नेते विनायक राऊत आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर घणाघाती आरोप केले. माझ्या नावाचा उल्लेख करून राणेंनी ट्विट केलं. विनायक राऊत यांना मोठी बातमी देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. राणेंनी बडेजावपणे घोषणा केली होती. आज त्यांची पीसी झाली. पण ट्विटमधून खोदा पहाड आणि निकला कचरा अशी राणेंची अवस्था झालेली दिसली. केवळ भाजपच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी राणेंची केविलवाणी परिस्थिती झाली आहे. ते स्वार्थासाठी लाचारी पत्करत आहेत, अशी टीकाही विनायक राऊत यांनी केली.

केंद्रीय मंत्र्यांनी ईडीच्या कार्यालयातून कागदपत्रे चोरली?

एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणं हा मंत्रिपदाचा दुरुपयोग आहे. ईडीच्या नोटीसा येणार आहेत असं सांगणं म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी केलेली हातमिळवणी असेल किंवा त्यांनी ईडीच्या कार्यालायातून कागदपत्रे तरी चोरली असतील. त्याशिवाय ते सांगू शकणार नाहीत. राज्यात ईडीचे उपद्व्याप सुरू आहेत. केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाने धमकी देणं हा गंभीर प्रकार आहे. याप्रकरणी संसदेत आवाज उठवणार आहोत. पंतप्रधानांच्या निदर्शनासही आणून देणार आहोत. स्वायत्त संस्थेला बदनाम करत आहेत. ईडीच्या कार्यालयातून कागदपत्रांची चोरी केंद्रीय मंत्री करत असावेत, त्यामुळेच ते असा दावा करत असावेत, असा हल्लाबोलही त्यांनी चढवला.

लाव रे तो व्हिडिओ

यावेळी विनायक राऊत यांनी राणेंवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काय आरोप केले होते. त्याचे व्हिडिओ दाखवले. लाव रे तो व्हिडिओ सांगत राऊत यांनी तीन व्हिडीओ दाखवून राणेंचा पर्दाफाश केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विधान परिषदेत राणेंची कुंडली मांडली होती. सिंधुदुर्गातील काही खुनांबद्दलही फडणवीस यांनी भाष्य केलं होतं. त्यामुले आम्ही उद्या दिलीप वळसे पाटील यांना भेटून सिंधुदुर्गातील आजवरच्या राजकीय हत्यांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. या हत्यांमागचे खरे गुन्हेगार आणि प्लानर कोण होते त्याची चौकशी करण्याची त्यांच्याकडे मागणी करणार आहोत, असं राऊत म्हणाले. राणे आणि त्यांच्या मुलांनी 300 कोटींचा घोटाळा केला होता. अविघ्न पार्क सोसायटीत हा घोटाळा झाला होता, असं सोमय्या बोलत असतानाचा व्हिडिओही त्यांनी यावेळी दाखवला.

संबंधित बातम्या:

VIDEO: राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला, काही महिला अडकल्या; गोरेगावात मनसेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

Drone Farming : शेती व्यवसयाचे बदलते चित्र, पंतप्रधान मोदींच्या हस्ते 100 ‘किसान ड्रोन’ला हिरवा झेंडा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.