सलमानच्या सुरक्षेसाठी विश्वास नांगरे पाटील मैदानात! वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरून सुरक्षेचा आढावा

लमान खानलाधमकीचं पत्र आल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सलमानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जावून आढावा घेतला.

सलमानच्या सुरक्षेसाठी विश्वास नांगरे पाटील मैदानात! वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरून सुरक्षेचा आढावा
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 1:54 PM

मुंबई : सलमान खानला (Salman Khan) धमकीचं पत्र आल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishawas Nangre Patil) यांनी सलमानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये (Galaxy Apartment) जावून आढावा घेतला. धमकीचं पत्र आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नांगरे पाटील यांनी आढावा घेतला. सलमानच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहता कामा नये, अश्या सूचना त्यांनी यावेळी तिथल्या अधिकाऱ्यांना दिल्या.

सलमानच्या सुरक्षेत वाढ

सकाळपासूनच माध्यमांचे कॅमेरे आणि सलमान खानचा बंगला याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पोलिसांनी सुरक्षे वाढ केली असून सर्व खबरदारी बाळगली जातेय. या पत्राने सगळ्या भाईजानच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय. आता या पत्रामागे नेमकं कोण आहे, याचा तपास केला जातोय.

अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे पत्र सलीम खान यांच्या बॉडिगार्डला सापडलं. सलमान खान वॉकला जातो आणि जिथे ब्रेक घेतो त्याठिकाणी हे पत्र आढळलं. त्यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचं निनावी पत्र रविवारी वांद्रे बँडस्टँडच्या विहाराजवळ सापडलं.

हे सुद्धा वाचा

पत्राविषयी पोलीस काय म्हणाले

या पत्राविषयी पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी सांगितलं की, “हे पत्र सलीम खानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना सापडलं. सलमान खान सकाळच्या वेळी त्याच्या सुरक्षारक्षकांसह फिरायला जातो. तिथे त्यांच्या ठरलेल्या जागी तो थोडा वेळ विश्रांती घेतो. तिथे एका बेंचवर हे पत्र सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पत्रातील मजकूर काय?

सलमान खान याला धमकी देणारं पत्र समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पत्रामध्ये सलमान आणि सलीम खान या दोघांनाही गंभीर धमक्या देण्यात आल्या आहेत. “मूसावाला जैसा कर दूंगा…”अशा आशयाचं हे पत्र आहे. सलमान वांद्रेतील बँडस्टँड परिसरात राहातो.  पोलीस तिथलं सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.