Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VVMC Election 2022 Ward No 19 | हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्याला लागणार का सुरुंग? वसई विरारासाठी कोण पछाडणार जंगजंग

VMC Election 2022 Ward No 19 | महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी पूर्वीही वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा प्रयोग राबवण्यात आलेला आहे. सत्तेच्या या एकहाती गडावर तोफगोळे पडायला सुरुवात झाली आहे.

VVMC Election 2022 Ward No 19 | हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्याला लागणार का सुरुंग? वसई विरारासाठी कोण पछाडणार जंगजंग
कोण मारणार बाजी?Image Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 8:02 AM

VMC Election 2022 Ward No 19 | महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी पूर्वीही वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा प्रयोग राबवण्यात आलेला आहे. वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या (VVMC election 2022) तोंडावर सत्तेच्या या एकहाती गडावर तोफगोळे पडायला सुरुवात झाली आहे. हितेंद्र ठाकूर सर्वेसर्वा असलेल्या महापालिकेवर शिंदेगट आणि भाजप झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे. मागील निवडणूक 2015ला झाली होती. आता येथील निवडणूक इतर महापालिकांच्या निवडणुकीसोबत होणार असल्याचे दिसत आहे. एकूण 115 जागांसाठी ही निवडणूक असणार आहे. 115 जागांपैकी तब्बल 106 जागांवर बहुजन विकास आघाडीने (Bahujan Vikas Aaghadi) एकहाती विजयी पतका फडकवली होती. त्यावेळी एक प्रभाग एक नगरसेवक अशी रचना होती. यावेळी तीन सदस्यीय प्रभागरचना असणार आहे. त्यातही बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र सध्यातरी तीन सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे प्रशासनाने तयारी केली आहे. यामुळे प्रभागांची रचना बदलली आहे. त्याचबरोबर आरक्षणही बदलले आहे. यावेळी एकूण 42 वॉर्डातून (Ward) निवडणुकीचा बार उडेल. ठाकूर यांच्या साम्राज्याला हादरे देण्यासाठी शिंदे-फडणवीस यांच्यासोबतच मनसेने ही कंबर कसली आहे.

प्रभागातील व्याप्ती कशी?

प्रभाग 19 मध्ये वाघेश्वरी मंदिर, वेलंकनी चर्च, उमादेवी मंदिर, सोपारा पोस्ट ऑफिस, करारी राईस मिल, सोपारा हॉस्पिटल, संत जोसेफ चर्च, उमराळे चर्च, सॉल्ट प्लँट, सेंट गोंसालो गार्सिया चर्च, वाघोली नाका, वाघेश्वरी तलाव आदी महत्त्वाचा परिसर आहे.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग 19 मधील एकूण लोकसंख्या 31,756 इतकी असून यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 886 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1432 इतकी आहे.

कोण मारणार बाजी?

2015च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवला होता. याठिकाणी 115पैकी 106 जागा मिळवत इतर सर्वच पक्षांना झोपवले होते. इतर पक्षांमध्ये शिवसेनेला 5, भाजपाला 1 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली होती. त्यामुळे विजयाची पुनरावृत्ती बहुजन विकास आघाडी करणार का, हे पाहावे लागणार आहे.

विजयी उमेदवार (2017)

प्रभाग 19 मध्ये मागील वेळी महेश हरी पाटील यांनी बाजी मारली होती. यावेळी आरक्षण आणि प्रभाग रचना बदलली असल्यामुळे प्रत्येकालाच आपला सोयीस्कर प्रभाग शोधावा लागणार आहे.

पक्षउमेदवारविजय
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजप
मनसे
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष
पक्षउमेदवारविजय
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजप
मनसे
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष
पक्षउमेदवारविजय
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजप
मनसे
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

आरक्षण कसे?

प्रभाग 19 मध्ये मागील वेळेप्रमाणे आरक्षण नसून त्यात बदल झाला आहे. त्यानुसार 19 अ हा इतर मागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी राखीव असणार आहे. तर ब हा सर्वसाधारण महिला आणि क हा विभाग सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले "मी बोलण्याचा
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले
'ऑपरेशन टायगर'चा सपाटा, शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठ खिंडार
'ऑपरेशन टायगर'चा सपाटा, शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठ खिंडार.
'मेरी कुर्सी छिनी गई', मुनगंटीवार म्हणाले, 'पंतप्रधानांची खुर्ची मी..'
'मेरी कुर्सी छिनी गई', मुनगंटीवार म्हणाले, 'पंतप्रधानांची खुर्ची मी..'.
दहावीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबुक्की
दहावीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबुक्की.
अण्णा हजारे मैदानात, महायुतीतील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
अण्णा हजारे मैदानात, महायुतीतील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.
कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा, दहावीचा पहिलाच पेपर फुटला
कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा, दहावीचा पहिलाच पेपर फुटला.
'मला हलक्यात घेऊ नका, जनता त्यांना..', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार
'मला हलक्यात घेऊ नका, जनता त्यांना..', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार.
धंगेकरांना धक्का, नव्या टीममधून डावललं; एकनाथ शिंदेंची भेट घेणं भोवलं?
धंगेकरांना धक्का, नव्या टीममधून डावललं; एकनाथ शिंदेंची भेट घेणं भोवलं?.
जरांगे देशमुख कुटुंबाच्या भेटीला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन
जरांगे देशमुख कुटुंबाच्या भेटीला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन.