रिपोर्टमध्ये छेडछाडीचा आदेश होता का? नितेश राणे यांनी सुनावलं
तेव्हा तुम्ही प्रश्न का विचारले नाही, असं नितेश राणे यांनी विनायक राऊत यांना सुनावलं.
मुंबई : सुशांतसिंग राजपुतचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी नेतानाचा रुपकुमारचा व्हिडीओ समोर आला. भाजप आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडीओ ट्वीट केलाय. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये छेडछाडीचा आदेश होता का, असं नितेश राणे विचारताहेत. तर, अडीच वर्षात नारायण राणे यांची नार्को टेस्ट का केली नाही. नितेश राणे यांचा विनायक राऊत यांना हा सवाल आहे. नितेश राणे म्हणाले, रुपकुमार शाह यांनी व्हिडीओ शेअर केला. त्यानुसार, सुशांतसिंह राजपुतची हत्या झाली होती. ती आत्महत्या नव्हती. ज्यांना ज्यांना संशय होता, त्यांच्यासाठी ते सत्य होतं. रुपकुमार शाह हे हॉस्पिटलला काम करत होते. तेव्हाचं सरकार हे महाविकास आघाडीचं आणि उद्धव ठाकरे यांचं होतं.
सुशांतच्या रिपोर्टमध्ये छेडछाड करण्याचे आदेश तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मंत्र्यांना वाचविण्यासाठी दिले होते का. तत्कालीन मंत्री म्हणजे कोण, यावर पेंग्विन असावं असं नितेश राणे म्हणाले. पेंग्वीन सर्च केलं की, त्यांचा फोटो येतो, असंही ते त्यांनी सांगितलं.
अडीच वर्षे विनायक राऊत यांचाचं मुख्यमंत्री होता. उद्धव ठाकरे यांच्या नावानं पुतळा बसविला होता का. मग, त्यावेळी चौकशी लावली पाहिजे होती ना. तेव्हा तुम्ही प्रश्न का विचारले नाही, असं नितेश राणे यांनी विनायक राऊत यांना सुनावलं.
महाविकास आघाडीच्या काळात गृहमंत्री, मुख्यमंत्री तुमचा असताना तेव्हा प्रश्न का विचारले नाही. तेव्हा चौकशी का केली नाही. आता कशाला फुकट्यासारखे बडबडत आहेत.