मुंबईच्या लोकलमधील सच्चा नागरिकाला बघून म्हणाल, ‘हा आहे खरा भारतीय’; सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा पाऊस…
या प्रवासामध्ये मी त्याचे नाव नाही विचारले मात्र त्यांच्या या श्रेष्ठ कामाबद्दल मी त्यांचे आभार मानले आहे. त्यामुळे या पोस्टला अनेक जणांकडून शेअर केली जात आहे.
मुंबईः सध्या मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पाकिटातील स्नॅक्स खाताना दिसून येत आहे. आणि तो खाल्यानंतर स्नॅक्सचे ते प्लॅस्टिकचे पाकिट आपल्याच बॅगमध्ये ठेवताना दिसून येत आहे. त्या व्यक्तिचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र व्हिडीओतील व्यक्तीचे प्रचंड कौतूक केले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला त्या व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे की, एक व्यक्ती मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत आहे.
ती व्यक्ती प्लास्टिकच्या पाकिटातील स्नॅक्स खाल्यानंतर ते पाकिट तो आपल्याच बॅगमध्ये ठेवताना दिसून येत आहे. हे करत असताना त्या व्यक्तिला मात्र आपला कोणतीतरी व्हिडीओ बनवत आहे हेच माहित नाही.
True Citizenship and responsible traveller?
Not asked his name but i said Thank you to him for his contribution.
I am Highly impressed.
If you feel something please write about him.@Central_Railway @RailwaySeva @RailMinIndia @mumbairailusers @mumbaimatterz @MirchiJeeturaaj pic.twitter.com/tqEfMpmRKU
— dharmesh barai?? (@dharmeshbarai) February 1, 2023
हा व्हिडीओ धर्मेश बराई या युजर्सनी शेअर केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर तो व्हायरल तर झालाच आहे, मात्र त्या व्यक्तिचे कौतूकही केले जात आहे. त्या व्यक्तिचा तो व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, देशातील हा खरा सच्चा नागरिक आणि जबाबदार प्रवासी आहे.
या प्रवासामध्ये मी त्याचे नाव नाही विचारले मात्र त्यांच्या या श्रेष्ठ कामाबद्दल मी त्यांचे आभार मानले आहे. त्यामुळे या पोस्टला अनेक जणांकडून शेअर केली जात आहे.
या व्हिडीओला अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये अनेकांनी म्हटले आहे की, कदाचित प्रत्येकजण असा असता तर, तर आणखी एकाने लिहिले आहे की, आपल्या सर्वांना या व्यक्तीकडून बरच काही शिकण्यासारखं आहे. तर या व्हिडीओला लाखो लोकांनी बघितला आहे आणि अनेकांनी त्याला सॅल्यूट केला आहे.