Mumbai : मुंबईकरावर पाणी कपातीचे संकट, पाणी जपून वापरा
येत्या काही दिवसांत अपेक्षित पाऊस न पडल्यास मुंबईवर पाणी कपातीचे संकट अटळ आहे.
मुंबईकरावर (Mumbaikar) पाणी कपातीचे संकट आलं आहे. मुंबईत पावसाने दडी मारल्याने पाणी संकट ओढवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. मुंबईवर पाणीकपातीचे संकट (Water Crisis) ओढावलं आहे. पावसाने दडी मारल्याने पाणी संकट ओढवण्याची मोठी प्रमाणात शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांना फटका
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात सध्या फक्त 11 टक्के पाणी पुरवठा शिल्लक आहे. म्हणजेच मुंबईत 30 ते 35 जुलै अखेर पर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकांवर ऐन पावसाळ्यात पाणी कपातीचे संकट आलं आहे. पावसाने दडी मारल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीचे हे संकट आले आहे. मुंबईत दररोज 3850 दशलक्ष लीटर पाण्याची गरज असते.
जून महिन्याच्या शेवटी मुंबई महापालिका पाण्याच्या साठ्या बाबत आढावा घेऊन निर्णय जाहीर करणार आहे. आता धरण क्षेत्रात एकूण जलसाठा शिल्लक 160831 दशलक्ष लिटर तर गेल्यावर्षी याच दिवशी जलसाठा 186719 दशलक्ष लीटर होता. त्यामुळे यावर्षी पाणीसाठी कमी झाला आहे. त्यामुळे पाणी वापरताना जपून वापरावे. मुंबईत पाऊस असाच लांबला तर मुंबईकरांवर पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
तलाव पाणीसाठा
अप्पर वैतरणा 0
मोडक सागर 48357
तानसा 6088
मध्य वैतरणा 23719
भातसा 76788
विहार 3715
तुलसी 2164
येत्या काही दिवसांत अपेक्षित पाऊस न पडल्यास मुंबईवर पाणी कपातीचे संकट अटळ आहे.