पहिल्या पावसातच रस्त्यावर पाणी;स्कुल बस अडकली पाण्यात; विद्यार्थ्यांना नागरिक, पोलिसांनी काढले बाहेर
वघ्या तासाभराच्या पावसात अशी अवस्था होत असल्याने प्रशासनाविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेने लवकरात तोडगा काढून या समस्या तात्काळ सुटका करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कल्याणः गेल्या काही दिवसांपासून किरकोळ पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील काही भागात पाणी साचून वाहतून कोंडी, रस्ता बदं होण्याचे प्रकार घडत आहेत. असाच प्रकार कल्याणजवळ शहाड (Kalyan Shahad) येथे पावसामुळे साचलेल्या पाण्यात शाळेची बस बंद पडल्याची (bus got stuck in the water) घटना घडली. पावसाच्या साचलेल्या पाण्यात मधोमध ही बस बंद पडल्याने बसमधील मुलांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Video Viral) झाला आहे. गेल्या 15 दिवसात या शहाड परिसरात पाणी साचून रस्ते बंद होण्याची ही चौथी वेळ आहे.
या परिसरात अवघ्या तासाभराच्या पावसात अशी अवस्था होत असल्याने प्रशासनाविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेने लवकरात तोडगा काढून या समस्या तात्काळ सुटका करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बस पाण्यात बंद पडल्यानंतर विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी, वाहतूक पोलिसांनी मदत करून विद्यार्थ्यांची सुटका केली.
विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी पोहचवले
ज्यावेळी पाण्यात बस अडकली त्यावेळी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी पुलाखाली उतरून बसमधील मुलांना बसमधून त्यांना सुरक्षित स्थळी पोहचवण्याचे काम करण्यात आले आहे. बंद पडलेल्या बसमुळे काही काळ येथील वाहतून व्यवस्था कोलमडली होती. त्यामुळे ही समस्या तात्काळ सोडवण्याची गरज आहे असं मत व्यक्त करण्यात येत होती.
वाहतूक पोलीस धावले मदतीला
शाळेची बस त्यामध्ये विद्यार्थी अडकल्याचे समजताच ड्युटीवर असलेले वाहतूक पोलिसांनीही पाण्यात उतरून विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी पोहचवण्याचे काम केले. रस्त्यात पाणी जास्त असल्याने आणि विद्यार्थ्यांनी पाण्यात उतरून रस्ता ओलांडून पलिकडे जाण्यासाठी धोकादायक असल्याने पोलीस आणि नागरिकांनी मदत करण्यास सुरूवात केली.
शहाडमध्ये वारंवार पाणी साचून वाहतूक कोंडी
शहाडमध्ये वेगवेगळ्या पावसाच्या दिवसात ठिकाणी पाणी साचत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचत आहेत. त्यामुळे ही समस्या प्रशासनाने तात्काळ सोडवून रस्ते मोकळे करावेत अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.