“माझा विनायक मेठे करण्याचा प्रयत्न”; अशोक चव्हाण यांनी अशी भीती व्यक्त का केली…
मराठी आरक्षणाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, मराठा समाजाबाबत जी माझी भूमिका मुख्यमंत्री असताना होता तिच भूमिका आजही आहे. त्यावेळीही मी मुख्यमंत्री असतानाही तिच भूमिका सभागृहात मांडली होती.
मुंबईः मागील गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण यांचाही विनायक मेठे केला पाहिजे किंवा करायचा आहे अशा प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून माझ्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. आपल्यावर कुणीतरी पाळत ठेवली जात असल्याची तक्रार जिल्हा पोलीसप्रमुखांकडे केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली फोनवरून चौकशी केली असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे.
अशोक चव्हाण यांचाही मेठे लवकरच केला पाहिजे, किंवा करायचा आहे. त्याचबरोबर आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार अशोक चव्हाण यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे केली आहे.
आपल्या मूळ सहीचे बनावट पत्र जे मी उद्धव ठाकरे यांना दिलेले आहे असं दाखवून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी प्रकारची भावना त्या पत्रात व्यक्त केली गेली आहे.
त्यामुळे या पत्राच्या माध्यमातून मराठा समाजाच्या संघटनामध्ये गैरसमज निर्माण करण्यचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे की, या पत्राच्या माध्यमातून विरोधकांनी राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्राची आवक जावक विभागातून खरं तरी चौकशी करणे गरजेची आहे असं मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
या बनावट पत्राच्या माध्यमातून मला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी प्रयत्न राजकीय विरोधकांकडून केला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
मराठी आरक्षणाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, मराठा समाजाबाबत जी माझी भूमिका मुख्यमंत्री असताना होता तिच भूमिका आजही आहे. त्यावेळीही मी मुख्यमंत्री असतानाही तिच भूमिका सभागृहात मांडली होती.
त्यामुळे अशी पत्र निर्माण करून राजकीय संभ्रम निर्माण करणे आणि राजकीयदृष्ट्या संपवण्याचाच हा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या निमित्ताने माझ्यावर पाळत ठेवण्याचा जो प्रकार आहे तो आता मला समजला आहे. मी कुठे जातो, मी कुठे थांबतो आणि कुठे किती वेळ जातो या गोष्टींचीही पाळत ठेवली जात असल्याने मी आता रितसर तक्रार नोंदविली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबतीत हा प्रकार घडल्याने आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली आहे.