मुंबईः मागील महिन्याच्या 24 नोव्हेंबर रोजी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सीमाभागातील काही गावांवर दावा केला. त्यानंतर महाराष्ट्र आमि कर्नाटकातील राजकीय वातावरण प्रचंड ढवळून निघाले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या गेल्या.महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीने जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतरही मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधण्यात आला. शिंदे-फडणवीस यांच्याकडून कर्नाटकला पाठबळ दिल्याची टीका होऊ लागली.
त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांनी आपल्या गटाची बाजू मांडत मराठी भाषिकांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ आमच्याशी आहे असा सज्जड दम कन्नडिगांना देण्यात आला.
यावेळी शिंदे गटातील आमदारांनी आम्ही कर्नाटकाला पाठबळ देणारे नाही तर पेटून उठणारी माणसं आहोत असा विश्वास आमदार संजय शिससाठ यांनी मराठी भाषिकांना दिला आहे.
सीमावादावर बोलताना आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या अस्मितेला जो कोणी धक्का देईल आणि धक्का लावील त्याच्या विरोधात आम्ही पेटून उठणारी माणसं आहोत असा इशारा त्यांनी कन्नडिगांना त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटक सरकारला पाठबळ देत असल्याची टीका विरोधकांकडून केली गेली होती. त्यावर बोलताना संजय शिरसाठ विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्र सरकारकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत अशी टीकाही शिंदे गटावर केली जात आहे. त्यावर बोलताना संजय शिरसाठी म्हणाले की, शांत बसणे, न बोलणे म्हणजे याचा अर्थ आम्ही गप्प आहोत असं समजू नका असा थेट त्यांनी विरोधकांसह कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
त्यामुळे त्यांनी टीकेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, आम्ही योग्य दिशेने तो प्रश्न सोडवणयाचा प्रयत्न करतो आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या कोणत्याही जनतेला कर्नाटकच्या जनतेने हात लावला तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील हे त्यांनी लक्षात ठेवावे असा थेट इशारा कर्नाटक सरकारला दिला आहे.
यावेळी त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आमची भूमिका स्पष्ट आहे, जी महाराष्ट्रातील गावं कर्नाटकात गेली आहेत, ती गावं आम्ही महाराष्ट्रात घेणार आहोत यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
त्यामुळे आमचा कर्नाटकला सहकार्य असं समजू नका असं कोणीही समजू नका असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.