Weather Report | शनिवारी पाऊस, मंगळवारी थंडी, बाहेर पडण्याआधी हा हवामान रिपोर्ट वाचा

येत्या मंगळवारपासून (12 जानेवारी) थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

Weather Report | शनिवारी पाऊस, मंगळवारी थंडी, बाहेर पडण्याआधी हा हवामान रिपोर्ट वाचा
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 10:45 AM

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाळी वातावरण आहे (Weather Alert Rain And Cold). गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शनिवारी (9 जानेवारी) मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर येत्या मंगळवारपासून (12 जानेवारी) थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे (Weather Alert Rain And Cold).

त्याशिवाय, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि मराठवाड्यात विजेच्या गर्जनेसह येत्या तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाने 7 ते 9 जानेवारीपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात केला होता. हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्टनुसार, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाण्यात जोरदार पावसाचा इशारा दिला होता.

शनिवारी मुंबईत मध्यमस्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर, 12 जानेवारीनंतर तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंतची घट होण्याची शक्यता असेल. यामुळे थंडीत वाढ होऊ शकते.

राज्यात 9 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात 8 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 7 ते 9 जानेवारी या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली, 8 जानेवारीला नाशिक, औरंगाबाद, 8 आणि 9 जानेवारीला मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर 8 आणि 9 जानेवारीला उत्तर महाराष्ट्र मध्ये, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईत काय स्थिती?

8 आणि 9 जानेवारीला मुंबईसह उपनगरात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर 8 आणि 9 जानेवारीला उत्तर महाराष्ट्र मध्ये, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मुंबईचं तापमान 24 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे.

दिल्लीत पाऊस की थंडी?

वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्लीचा पारा 1.1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. तर एका आठवड्यानंतर गुरुवारी दिल्लीचा पारा 14.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला. दिल्लीतील हे गेल्या चार वर्षातील जानेवारी महिन्यातील सर्वोच्चतम तापमान आहे. हवामान विभागानुसार, यापूर्वी 2017 मध्ये जानेवारीमध्ये 26 तारखेला दिल्लीचं तापमान 16 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं.

आज दिल्लीत सकाळी आणि सायंकाळच्या वेळी पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच दाट धुकंही पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीत थंडी वाढण्याची शक्यता आहे.

Weather Alert Rain And Cold

संबंधित बातम्या :

Weather Alert | मुंबई, पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज, पावसामुळे थंडी गायब

Weather Alert | राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी, काढणीला आलेल्या पिकांवर संकट

weather alert | पश्चिमी वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण, मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

Weather Alert | एकीकडे हाडं फोडणारी थंडी, त्यात पावसाळ्यासारखा मुसळधार, महाराष्ट्रात काय होणार?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.