पुढील 5 दिवस ‘या’ ठिकाणी पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज
पुणे : गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिक उन्हाच्या चटक्याने हैराण झाले आहेत. कधी एकदा पाऊस पडतो असे सर्वांनाच झालं आहे. महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान पुढील पाच दिवस वायव्य भारतात पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाद्वारे वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दिल्ली, उत्तरप्रदेशात […]
पुणे : गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिक उन्हाच्या चटक्याने हैराण झाले आहेत. कधी एकदा पाऊस पडतो असे सर्वांनाच झालं आहे. महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान पुढील पाच दिवस वायव्य भारतात पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाद्वारे वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दिल्ली, उत्तरप्रदेशात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. महाराष्ट्रात मात्र येत्या 10 जूनपर्यंत पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढील पाच दिवस उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली या ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. या ठिकाणच्या तापमानात 2-4 डिग्रीपर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं हवामान विभागाद्वारे सांगण्यात आलं आहे. मात्र येत्या पाच दिवसात नागालँड, मणीपूर, मिझारोम, त्रिपूरा, आसाम, मेघालय, केरळ, या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या 4 जूनला नागालँड, मणीपूर, मिझारोम, त्रिपुरा, आसाम, मेघालय या ठिकाणी पाऊस पडेल. तर राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, विदर्भ या ठिकाणी मात्र तापमानात वाढ होईल. त्यानतंर 5 किंवा 6 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल. त्यामुळे 5, 6, 7 जून या तिन्ही दिवशी केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, लक्षद्वीप या ठिकाणी काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. मात्र विदर्भ, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा या ठिकाणी मात्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
दरम्यान येत्या 6 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर 8 तारखेपासून पश्चिम बंगालसह, ओदिशा, कर्नाटक या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र दिल्ली, हरियाणा या राज्यात मात्र पाऊस पडणार नाही.