Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather update : मान्सूनची वेगाने वाटचाल, तीन दिवसात अंदमानात धडकणार!

Weather update : मान्सूनची वेगाने वाटचाल सुरु असून येत्या तीन दिवसात मान्सून अंदमानात धडकेल, असा अंदाज आहे. Monsoon Rain

Weather update : मान्सूनची वेगाने वाटचाल, तीन दिवसात अंदमानात धडकणार!
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 4:23 PM

मुंबई : भारताच्या पश्चिम किनारपट्टीला नुकताच तोक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) फटका बसलेला आहे. तेवढ्यातच आता भारतीय नागरिकांना दिलासा देणारी गोष्ट समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वारे (Monsoon) पुढील तीन दिवसात 21 मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे. याशिवाय यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र तयार होईल, असा अंदाज देखील हवामान विभागनं वर्तवला आहे. (Weather update IMD predicts Monsoon will reach at Andaman till Friday make low pressure zone in bay of Bengal)

मान्सून 21 मेला अंदमान बेटांवर दाखल होणार

नैऋत्य मोसमी वाऱ्यांना भारतीय उपखंडात मान्सून म्हटलं जातं. भारतीय हवामान विभागानं हे वारे 1 जूनला केरळमधील दाखल होतील, असा अंदाज वर्तवला आहे. सध्या हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 जुलैला नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मान्सून 1 जूनला केरळमध्ये

यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

यंदा मान्सून वेळेत दाखल होणार?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्राला अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसाचा फटका

महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्याभरात अवकाळी पाऊस, गारपीट, पूर्वमोसमी पावसाचा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपीट देखील झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती. तर, पूर्वमोसमी पावसामुळे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील नदीला पूर देखील आलेला पाहायला मिळाला.

स्कायमेटचा अंदाज काय?

स्कायमेटच्या मान्सूनच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे

संबंधित बातम्या:

कसा असेल यावर्षीचा मान्सून, पाऊसकाळ? स्कायमेटचा हा अंदाज वाचा

ऐन कोरोना काळात गूड न्यूज! यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मान्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज

(Weather update IMD predicts Monsoon will reach at Andaman till Friday make low pressure zone in bay of Bengal)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.