पाकिस्तानविरोधात घोषणा द्या, 10 टक्के सूट घ्या, एका हॉटेलची अजब ऑफर

नवी मुंबई : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट पसरली आहे. विविध पद्धतीने भारतीय नागरिक आपल्या शहीद जवानांना श्रद्धांजली देत आहेत. पाकिस्तान विरोधात आपला निषेध व्यक्त करत आहेत. नवी मुंबईच्या खारघरमधील हॉटेल व्यावसायिक सय्यद खान यांनी आपल्या ‘लकी तवा हॉटेल’मध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी […]

पाकिस्तानविरोधात घोषणा द्या, 10 टक्के सूट घ्या, एका हॉटेलची अजब ऑफर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

नवी मुंबई : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट पसरली आहे. विविध पद्धतीने भारतीय नागरिक आपल्या शहीद जवानांना श्रद्धांजली देत आहेत. पाकिस्तान विरोधात आपला निषेध व्यक्त करत आहेत.

नवी मुंबईच्या खारघरमधील हॉटेल व्यावसायिक सय्यद खान यांनी आपल्या ‘लकी तवा हॉटेल’मध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी प्रत्येक ऑर्डरवर 10 टक्के सूट देण्याची ऑफर दिली आहे. परंतु यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. 10 टक्के सूट मिळवण्यासाठी ग्राहकांना पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा द्याव्या लागणार आहेत. या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांनीही या आगळ्यावेगळ्या ऑफरचे स्वागत केले आहे. प्रत्येक ग्राहक हा आपला पाकिस्तानविरोधातील रोष याठिकाणी जाहीर करतो. पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते.

लकी तवा हॉटेलची ही ऑफर सर्वत्र वाऱ्यासारखी पसरत असून ग्राहक या ऑफरचा फायदा घेण्यासाठी गर्दी करत आहेत. यावेळी हॉटेल व्यावसायिक सय्यद खान यांनी भारतातील मुस्लिम हे भारतासोबत असून पाकिस्तानविरोधात आहेत. तसेच, लष्करात जाऊन आम्ही काम करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानचा निषेध आम्ही या पद्धतीने करतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पुलवामा हल्ला :

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे गुरुवारी 14 फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. आदिल अहमद डार नावाच्या दहशतवाद्याने सुसाईट बॉम्बर बनून हा आत्मघाती हल्ला केला.

संबंधित बातम्या :

भीक मागणाऱ्या महिलेची देशभक्ती, जमवलेली सर्व रक्कम शहिदांना समर्पित

प्रत्येक गोष्टीसाठी सहकार्य करायला तयार, सौदीही दहशतवादाविरोधात भारतासोबत

‘पुलवामाप्रमाणे आत्मघाती हल्ला करु’, जैशनंतर आता हिजबुलची धमकी

काश्मीरच्या प्रत्येक वस्तूवर बहिष्कार टाका, मेघालयच्या राज्यपालांचं आवाहन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.