पश्चिम रेल्वेच्या 15 डब्यांच्या लोकलची संख्या उद्या 15 ऑगस्टपासून वाढणार, पाहा किती वाढणार पंधरा डबा लोकल
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याबाबत माहीती देताना सांगितले की पंधरा डब्यांच्या प्रत्येक लोकल मागे प्रवासी वाहण्याची क्षमता 25 टक्क्यांनी वाढणार आहे.
मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवरील 15 डब्यांच्या लोकलच्या संख्येत उद्या 15 ऑगस्टपासून वाढ होत आहे. पश्चिम रेल्वेवरील 49 लोकल उद्यापासून 12 ऐवजी 15 डब्यांच्या होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक लोकल मागे प्रवासी वाहण्याची क्षमता 25 टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या गर्दीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहेत.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याबाबत माहीती देताना सांगितले की उद्यापासून 49 बारा डब्यांच्या लोकल पंधरा डब्याच्या म्हणून चालविण्यात येतील. त्यामुळे प्रत्येक लोकल मागे प्रवासी वाहण्याची क्षमता 25 टक्क्यांनी वाढणार आहे. तसेच याबदलामुळे पश्चिम रेल्वेवरील पंधरा डब्यांच्या एकूण लोकलची संख्या आता 150 वरुन 199 इतकी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
एकूण लोकल फेऱ्यांची संख्या कायम
या नव्या 49 पंधरा डब्यांच्या फेऱ्यांमध्ये 25 फेऱ्या डाऊन दिशेला तर 24 फेऱ्या अप दिशेला चालविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या एकूण लोकल फेऱ्यांच्या संख्येत त्यामुळे वाढ होणार नसून ती 1394 इतकी कायम रहाणार आहे. त्यात 79 एसी लोकलचा समावेश आहे.
down local –
up local wr