यात्रीगण कृपया, सोमनाथ मंदिर स्थानक में पधारे, 157 कोटींतून पश्चिम रेल्वेचा रेल्वे स्थानक विकास

पश्चिम रेल्वेने गुजरातची राजधानी गांधीनगर रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जाचे स्थानक म्हणून पुनर्विकास केला आहे. अशा प्रकारच्या दर्जा असलेले हे भारतीय रेल्वेवरील पहिले स्थानक आहे. भारतीय रेल्वेने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळजवळचे राणी कमलापती स्थानक आणि बेंगळुरू-कर्नाटकमधील सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस या स्थानकांचाही पुनर्विकास केला आहे. पश्चिम रेल्वेने सोमनाथ, सुरत, उधना, साबरमती, न्यू भुज आणि अहमदाबाद या सहा स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू केले आहे.

यात्रीगण कृपया, सोमनाथ मंदिर स्थानक में पधारे, 157 कोटींतून पश्चिम रेल्वेचा रेल्वे स्थानक विकास
somnath mandir station Image Credit source: somnath mandir station
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 5:25 PM

मुंबई : अफगाणचा शासक महमूद गझनीने सोमनाथ मंदिराची संपत्ती लुटण्यासाठी देशावर 17 वेळा आक्रमण केले हाेते. 12 ज्योर्तिलींगापैकी एक असलेल्या हिंदूंसाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या सोमनाथ मंदिराची प्रतिकृती आता पश्चिम रेल्वे ‘सोमनाथ मंदिर स्थानका’च्या रुपाने साकारणार आहे. पश्चिम रेल्वेने गुजरातच्या ‘सोमनाथ मंदिर रेल्वे स्थानका’चा पुर्विकासाचे काम वेगाने सुरु केले आहे. तब्बल 157.4 कोटी रुपये खर्चून या स्थानकाला हेरीटेज लूक दिला जाणार आहे. सोमनाथ स्थानकाचा विकास करताना हे स्थानक सोमनाथ मंदिराचेच प्रतिरूप वाटेल असे त्याचे डिझाईन तयार करण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेने देशभरातील 204 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकासाची योजना आखली आहे. त्यापैकी तीन स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू झाले आहे, तर 43 स्थानकांचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. आता सोमनाथ मंदिर रेल्वेस्थानकाचा विकास केला जात आहे.

पश्चिम रेल्वेने भावनगर डीव्हीजनमध्ये असलेल्या गुजरातच्या सोमनाथ मंदिर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास करण्याची योजना आखली आहे. 157.4 कोटी रुपये खर्चून सोमनाथ स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे. या स्थानकाचा पुनर्विकास करताना त्यास सोमनाथ मंदिराचेच प्रतिरुप त्याचा पुर्नविकास केला जाणार आहे.

या स्थानकाचे कामकाज मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 1 सप्टेंबर 2022 पासून हे स्टेशन बांधकाम करण्यासाठी बंद करण्यात आले आहे आणि सध्याची जुन्या स्टेशन इमारतीला पाडण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर पायासाठी खोदण्याचेही काम सुरू करण्यात आले आहे.

शहराच्या दोन्ही बाजूंना रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंच्या स्टेशन इमारतींशी जोडण्यात येणार आहेत. मुख्य स्थानकाच्या इमारतीमध्ये छताच्यावर 12 ज्योर्तिलींगाचे प्रतिनिधित्व करणारे 12 शिखरं असतील आणि दर्शनी भागाची थीम देखील श्री सोमनाथ ज्योर्तिलींग मंदिरासारखीच असेल. त्याची रचना भारतीय संस्कृती आणि परंपरेचे विविध पैलू प्रतिबिंबित करेल आणि प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेचा सुंदर मिलाफ असेल.

सोमनाथ मंदिर स्थानकाच्या प्लॅटफॉर्मच्यावर एक प्रशस्त छताचा ‘रूफ प्लाझा’ असेल ज्यामध्ये सर्व प्रवासी सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यात किरकोळ विक्रीसाठी जागा, कॅफेटेरिया आणि मनोरंजन सुविधा, फूड कोर्ट, वेटिंग लाउंज, मुलांसाठी खेळण्याची जागा, स्थानिक उत्पादनांसाठी ‘कियॉस्क’ इत्यादी सुविधा या एकाच छताखाली दिल्या जाणार आहेत.


        
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.