मुंबई : अनलॉकच्या या टप्प्यावर मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर आता पश्चिम रेल्वेने गर्दी टाळण्यासाठी विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या 700 पर्यंत वाढवली आहे. यात 10 एसी गाड्यांचाही समावेश आहे. 15 ऑक्टोबरपासून या अधिकच्या विशेष फेऱ्या सुरु होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना प्रवासासाठी गर्दी करावी लागणार नाहीये (Western Railway to run 700 Special Suburban Services in Mumbai).
पश्चिम मार्गावर याआधी 506 फेऱ्या सुरु होत्या. आता त्या वाढून एकूण 700 फेऱ्या होणार आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवासासाठी मुंबईकरांना करावी लागणारी गर्दी काही प्रमाणात कमी होणार आहे. तसेच गाड्यांची फ्रिक्वेन्सी देखील वाढणार आहे. राज्य सरकारने परवानगी दिलेल्या आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकले प्रवास करताना गर्दी टाळून शारीरिक अंतर पाळणे आणि मास्कचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
To ensure social distancing & prevent overcrowding, special services will be increased from 506 to 700 per day including 10 AC services from 15 Oct 2020 on WR’s Mumbai Suburban section
Essential staff as notified by State Govt requested to follow social distancing & wear a mask. pic.twitter.com/9NddeZ28ZA
— Western Railway (@WesternRly) October 13, 2020
पश्चिम रेल्वेने दैनंदिन प्रवासात होणारी गर्दी आणि त्यातून संसर्गाचा वाढणारा धोका कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच फेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. त्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
स्वतः घरी बसलात म्हणून लोकांना घरी बसवायचा विचार आहे का? संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला सवाल
‘जीआर’ निघाला, ‘क्यूआर’ मिळेना, लोकल प्रवासासाठी डबेवाले वेटिंगवर
संबंधित व्हिडीओ :
Western Railway to run 700 Special Suburban Services in Mumbai Maharashtra