नव्या राष्ट्रीय शिक्षणात बदल काय?, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एस. बिर्डेकर यांनी सांगितलं

या नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बाहेरचे चित्रकार, गायक येतील. ते अधिकचं ज्ञान देतील. शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाईल.

नव्या राष्ट्रीय शिक्षणात बदल काय?, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एस. बिर्डेकर यांनी सांगितलं
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 10:01 PM

मुंबई : देशातील शिक्षण पद्धतीत बदल झालेत. यानुसार, शालेय शिक्षणात ५, ३, ३, ४ या सूत्रानुसार बदल झाला आहे. ईसीसीई अर्ली चाईल्ड केअर एज्युकेशन हा सुरुवातीचा पायाभूत भाग आहे. संगोपन आणि बालशिक्षण असा भाग त्यात आहे. त्याबाबत चांगला विचार केला आहे. जगातल्या संशोधनाचा अभ्यास करून शिवाय ब्रेन स्टडीजचा अभ्यास करून अभ्यासक्रम ठरवला आहे, अशी माहिती शिक्षणतज्ज्ञ बी. एस. बिर्डेकर यांनी दिली.

शिक्षण आनंददायी हवं

डॉ. बिर्डेकर म्हणाले, ८५ टक्के ब्रेनचा विकास हा शून्य ते सहा या वयोगटात होतो. त्या काळातचं संगोपन आणि शिक्षण चाललं पाहिजे. कृतीप्रधान, आनंददायी शिक्षण असावं. बालकाच्या कृतीला वाव मिळावं, असं असावं. अंकज्ञान, भाषाज्ञान असावं. ही भक्कम व्हावी. त्यानंतर पुढच्या शिक्षणाला मुलं तयार व्हावीत. बालसंगोपन चांगलं झालं तर तुरुंगात जाणाऱ्यांची संख्या जास्त होणार नाही, असंही बिर्डेकर यांनी म्हंटलं.

खेळावर आधारित शिक्षण

या नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बाहेरचे चित्रकार, गायक येतील. ते अधिकचं ज्ञान देतील. शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाईल. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण हवं. परीक्षा आणि शिक्षण भीतीदायक आहे. पास, नापास होणं याला वलय निर्माण झालं. ते बाजूला काढून शिक्षण द्यायचं आहे. खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाईल. अॅक्टिव्हीटी बेस, खेळाच्या आधारावर शिक्षण दिलं जाईल. गेम मुलांना आवडते. तेच मुलांना देऊ. ताण येणार नाही. शिक्षण अधिक आनंददायी करण्याचा विचार आहे, असंही बिर्डेकर यांनी सांगितलं.

चांगला संवाद करणारी माणसं हवीत

नव्या शैक्षणिक धोरणात भाषा शिक्षणाला महत्त्व दिलं आहे. गेल्या तीन दशकात सायन्स, टेक्नॉलॉजी, भाषा, कला यांचा अभ्यासक्रमात सहभाग राहणार आहे. दुसऱ्याला मोटिव्हेट कसं करतात, त्यासाठी भाषा महत्त्वाची आहे. चांगला संवाद करणारी माणसं हवी असतात.

युजीसीत बदल करणे गरजेचे आहे. टॉप हंड्रेडमधली लोकं देशात आले पाहिजे. म्हणजे बाहेर जाणाऱ्या मुलांना देशातच शिक्षण उपलब्ध होईल. परदेशी विद्यापीठांना किती मुभा द्याव्या, याचा पुनर्विचार करणे गरजेचे असल्याचंही बिर्डेकर यांनी म्हंटलं.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.