हे चार प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं महाराष्ट्राचं नुकसान, आदित्य ठाकरे यांचा घणाघात
कुठल्याही उद्योजकाचा या घटनाबाह्य सरकारवर विश्वास राहिला नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंबई : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारचं अपयश लोकांसमोर मांडलं. आदित्य ठाकरे म्हणाले, वेदांता फॉक्सकॉनबद्दल बोलल्यानंतर आम्ही सांगितलं होतं की, एअरबसच्या तरी मागे लागा. तो प्रकल्प तरी महाराष्ट्रात आणा. शेतीचं नुकसान होतंय. आपण उद्योग जगातात चौथा मोठा प्रकल्प बाहेर निघून गेलाय. पहिला मोठा प्रकल्प होता. वेदांता फॉक्सकॉनचा. हा प्रकल्प पुण्यात आणणार होतो. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांनी हाऊसमध्ये सांगितलं होतं की, तो महाराष्ट्रामध्येच येणार आहे. ऑगस्टपर्यंत त्याच्या बैठका चालल्या. सप्टेंबरमध्ये हा प्रकल्प गुजरातमध्ये निघून गेला.
दुसरा प्रकल्प म्हणजे बल्क ड्रग्स पार्क. मी अनेकदा सांगितलं आहे आपल्याकडं ३९४ फार्मसी कॉलेज आहेत.ड्रग्स प्रोडक्शनमध्ये आपणं हायस्ट असू. बल्क ड्रग्स पार्क अन्य राज्यांना दिले गेले. हे पार्क रायगड जिल्ह्यात येणार होते. पण, महाराष्ट्रात काही हे आणू शकले नाही, असे ताशेरे आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर ओढले.
तिसरा प्रकल्प होता मेडिकल डिव्हाईस पार्क. हे संभाजीनगर जिल्ह्यात येणार होतं. तिथं अशीच मोठी गुंतवणूक आली असती. त्यासोबत अनेक क्लस्टर इंडस्ट्रीज आल्या असत्या. पण, यातही सरकार अपयशी ठरलंय.
चौथ्या प्रकल्पाबाबत आम्ही जुलैपासून आरडाओरडा करतोय. एअर बस टाटा तरी जाऊ देऊ नका. तो आज प्रकल्प आपल्या हातातून गेला आहे.
प्रत्येक राज्य अशा प्रकल्पासाठी प्रयत्न करतात. करार करून राज्यात प्रकल्प घेऊन जातात. डबल इंजिनचं सरकार म्हणतो. पण, महाविकास आघाडीचं सरकार असताना डबल इंजिन व्यवस्थित चाललेलं.
आता एक इंजिन हे फेल झालेलं आहे. या राज्यात येणारी गुंतवणूक इतर राज्यात गेली. कदाचित तिकडल्या राज्यातल्या निवडणुकीसाठी असेल. ते अजून काही चांगलं देऊ शकत असतील.
कुठल्याही उद्योजकांचा तसेच गुंतवणूकदाराचा या सरकारवर विश्वास राहिला नाही. आम्हाला या सरकारवर विश्वास राहिला नाही. तसंच कुठल्याही उद्योजकाचा या घटनाबाह्य सरकारवर विश्वास राहिला नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.