गणपत गायकवाड, महेश गायकवाड वाद जमिनीवरुन नव्हे तर वेगळेच गणित

| Updated on: Feb 05, 2024 | 9:40 AM

Ganpat Gaikwad Firing | भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्या. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडली आहे. परंतु दोघांमधील हा वाद जमिनीवरुन आहे की दुसरेच काही कारण आहे.

गणपत गायकवाड, महेश गायकवाड वाद जमिनीवरुन नव्हे तर वेगळेच गणित
mla-ganpat-gaikwad-firing CCTV Fooatage
Follow us on

कल्याण, दि.4 फेब्रुवारी 2024 | भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वादाने सर्वात गंभीर रुप घेतले. अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागेवरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी त्यांना उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात बोलवले होते. परंतु आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. जमिनीवरुन असलेला हा वाद राजकीयसुद्धा आहे. या वादाला आगामी निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. विधानसभा निवडणुकीची तयारीवरुन वाद आहे.

काय आहे वाद

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा या वादाचे कारण आहे. या मतदार संघात पंधरा वर्षांपासून विद्यामान भाजप आमदार गणपत गायकवाड यांची सत्ता आहे. त्यांना शह देण्यासाठी शिवसेनेकडून तयारी सुरु झाली. त्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश गायकवाड प्रयत्न करत आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे आश्वसन दिले गेले. त्यामुळे ते गेल्या दोन वर्षापासून चांगलेच सक्रीय झाले. मतदार संघ पिंजून काढत आहे. जनसंपर्क वाढवला आहे. या प्रकाराने आमदार गणपत गायकवाड अस्वस्थ झाले.

आधी अपक्ष नंतर भाजपात

गणपत गायकवाड दोन वेळा कल्याण पूर्वमधून अपक्ष निवडून आले. त्यानंतर सत्ता बदल असल्यामुळे ते राष्ट्रवादीत गेले. मग पुन्हा २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली. शिवसेनेकडून कल्याण पूर्व मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले गेले. यामुळे दोन वर्षापासून महेश गायकवाड यांनी या भागातील नागरी समस्या, विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी काम सुरु केले. शिवसेनेचे ते माजी नगरसेवक होते. खासदार शिंदे यांचे सहकार्य त्यांना मिळत होते. यामुळे महेश गायकवाड यांची कामांची चर्चा होऊ लागली होती. यामुळे आमदार गणपत गायकवाड अस्वस्थ झाले. तसेच हा मतदार संघ शिवसेनेकडे जाण्याबाबत चर्चा सुरु झाली होती.

हे सुद्धा वाचा

मतदार संघात बदलाची चर्चा

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे आहे. पूर्व भागाचे नेतृत्व भाजपाचे गणपत गायकवाड यांच्याकडे आहे. या दोन्ही मतदार संघात बदलाची चर्चा सुरु होती. यामुळे गणपत गायकवाड अस्वस्थ झाले होते. त्यातून हा प्रकार घडला आहे.

हे ही वाचा

उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या कॅबिनमध्ये काय घडले, Photo मधून पाहा