Chagan Bhujbal | राजकारणात मी दोनदा खोटं बोललो, छगन भुजबळ यांनी सांगितले हे किस्से

Chagan Bhujbal | राजकारण म्हटलं की किस्से आणि कथा या ओघानं आल्याच. त्या संपता संपत नाही. पारावरच्या गप्पा जशा रंगतात. तसे राजकीय जीवनातील आठवणी काही पिच्छा सोडत नाहीत. छगन भुजबळ बेधडक बोलणारे आहेत. त्यांनी राजकीय जीवनात दोनदा खोटं बोलल्याचं सांगितले. एक किस्सा तर काल परवाचाच आहे. पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ते काय बोलले खोटे?

Chagan Bhujbal | राजकारणात मी दोनदा खोटं बोललो, छगन भुजबळ यांनी सांगितले हे किस्से
Follow us
| Updated on: Oct 12, 2023 | 8:54 PM

मुंबई | 12 ऑक्टोबर 2023 : राजकीय जीवनात अनेक प्रसंग उभे ठाकतात. नेते, पुढारी त्यानुसार भूमिका बदलतात. मोठे राजकीय भूंकप घडवून आणतात. अनेक कथानकांचे ते सूत्रधार असतात. राजकारणात कायम पडद्यामागे घडामोडी घडत असतात असे म्हणतात. त्याची प्रचिती काही दिवसांनी सर्वांनाच येते. गेल्या तीन चार वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणाने जी कलाटणी घेतली आहे, ती अनाकलनीय आहे. राजकारणांच्या पोटात आणि मनता अनेक गोष्टी बेमालूपणे दडलेल्या असतात. त्या कधी तरी बाहेर पडतात. छगन भुजबळ ही त्याला अपवाद नाहीत. त्यांनी राजकीय जीवनात दोनदा खोटं बोलल्याचं जाहीरपणे सांगितले.

राजकीय प्रवास 

छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास मुंबईतून सुरु झाला. कडवट शिवसैनिक ते बहुजन समाजाचे नेते म्हणून अनेक राजकीय घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा प्रवास झाला आहे. त्यांनी दरारा असताना, झंझावात असताना मंडल प्रकरणात शिवसेनेला मोठं खिंडार पाडलं होतं. तेही एकट्याने नाही तर 18 आमदारांना सोबत घेऊन त्यांनी हा प्रयोग राबवला होता. राष्ट्रवादीत ते स्थिरावले. आता अजित पवार यांच्या गोटातून त्यांनी सरकारसोबत घरोबा केला आहे.

हे सुद्धा वाचा

तिकडे काय होते ते बघायला गेले ते परत आलेच नाही 

राष्ट्रवादी काँग्रेस महिन्यात या जून महिन्यात उभी फूट पडली. 2 जुलै अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीतील आमदार सत्तेत वाटेकरी झाले. शपथविधीची घडामोड सुरु असताना शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना फोन केला. परिस्थितीची विचारणा केली. त्यावेळी तिकडे काय होतंय, ते बघून येतो असे ते पवारांना म्हणाले. पण नंतर त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हा किस्सा शरद पवार यांनी माध्यमांसमोर मांडला होता. त्यानंतर 2 जुलै रोजी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी खोटं बोलल्याची कुबली छगन भुजबळ यांनी बुधवारी Tv9 मराठीच्या मुलाखतीत दिली.

बाळासाहेब ठाकरे यांच्यांशी काय बोलले खोटे?

तर सहाजिकच हा किस्सा पण शिवसेना सोडतानाचाच होता. 1991 साली छगन भुजबळ यांनी पहिल्यांदा शिवसेनेला मोठं खिंडार पाडलं होतं. राज्यात सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं सरकार होतं. शिवसेनेचा राजकारणात दरारा होता. गावोगावी शाखा उघडण्यात येत होत्या. त्याचवेळी मंडल आयोगावरुन ठिणगी पडली. 54 पैकी 18 आमदारांना सोबत घेऊन त्यांनी शिवसेनेला मोठा हादरा दिला. शिवसेना फुटीचे वृत्त त्यावेळी वृत्तपत्रांमध्ये आले. त्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला याविषयीची विचारणा केली होती. त्यावेळी आपण शिवसेना सोडणार नसल्याचे खोटे बोललो होतो, असे भुजबळ यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.