रोड नंबर 5 वर नेमकं काय घडलं?, मॉर्निंग वॉकवेळी हल्ला कसा झाला?; संदीप देशपांडे यांनी सांगितला घटनाक्रम

संजय राऊतांचा मेंटल बॅलन्स गेला आहे. मी त्यांना पत्र लिहून काळजी व्यक्त केली आहे. मेंटल बॅलन्स गेलेल्या माणसाला आपली कुणी तरी सुपारी दिल्याचं वाटतं. सतत कोण तरी हल्ला करेल असं वाटत असतं.

रोड नंबर 5 वर नेमकं काय घडलं?, मॉर्निंग वॉकवेळी हल्ला कसा झाला?; संदीप देशपांडे यांनी सांगितला घटनाक्रम
sandeep deshpandeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 12:58 PM

मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल दादरच्या शिवाजी पार्कात जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यातून संदीप देशपांडे थोडक्यात बचावले. या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला कसा? हल्लेखोर आले कुठून? ते हल्लेखोर कोण होते? यावर आता चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा सुरू असतानाच संदीप देशपांडे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर हल्ला कसा झाला याची माहिती दिली आहे. काल नेमकं काय घडलं याची माहितीच त्यांनी मीडियासमोर दिली आहे.

मी नेहमीप्रमाणे वॉकला गेलो होतो. रोड नंबर 5 येथे गेटवरून जात असताना पाठीमागून कुणीतरी माझ्यावर स्टम्पने हल्ला केला. मला वाटलं चेंडू लागला. पाठीमागे वळून पाहिलं तेव्हा एकाजणाने माझ्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला. तो वार मी झेलला. दुसऱ्याने माझ्या पायावर मारलं. त्यामुळे मी खाली पडलो. त्यांनी मारहाण सुरू केली. तेव्हा लोक धावत आले. त्यांनी लोकांना दम दिला. पण लोक जेव्हा त्यांच्या अंगावर धावून गेले तेव्हा ते चार पाच लोक पळून गेले, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

त्यांना संरक्षण द्या

या हल्ल्याचं भांडूप कनेक्शन समोर आलं आहे. पोलिसांचा तपास योग्य रितीने चालला आहे. तो पूर्ण होईपर्यंत मी त्यावर बोलणार नाही. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी काळजीपोटी माझ्या संरक्षणासाठी दोन पोलीस पाठवले. माझी सरकारला विनंती आहे. आम्ही कुणाला भीक घालत नाही. हल्ल्याला घाबरत नाही. त्यामुळे आम्हाला संरक्षण नको. सरकारने आमचं संरक्षण काढून घ्यावं. आम्हाला संरक्षणाची गरज नाही. ज्यांनी हल्ला केला त्यांना संरक्षण द्यावं. कुणी हल्ला केला हे आम्हाला माहीत आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

राऊतांचा मेंटल बॅलन्स गेला

यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊतांचा मेंटल बॅलन्स गेला आहे. मी त्यांना पत्र लिहून काळजी व्यक्त केली आहे. मेंटल बॅलन्स गेलेल्या माणसाला आपली कुणी तरी सुपारी दिल्याचं वाटतं. सतत कोण तरी हल्ला करेल असं वाटत असतं. मग फ्रस्टेशनमध्ये ते शिव्या घालण्याचं काम करतात. आज ते निवडणूक आयुक्तांना शिव्या घालत आहेत. उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर ते न्यायाधीशांनाही शिव्या घालतील. उद्धव ठाकरे मोठे डॉक्टर आहेत. ते जगाला सल्ला देतात. त्यांनी राऊतांवर इलाज केला पाहिजे. माणूस फ्रस्टेड झाला तर अशांना रोग होतात, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.