Mumbai Rain Update | Good News, लवकरच मुंबईला पाणी पुरवठा करणार दुसरा तलाव ओसांडून वाहणार

Mumbai Rain | सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये काय स्थिती आहे? मुंबईच्या तलावात सध्या किती दिवस पुरले इतका पाणीसाठा आहे?. नक्कीच मुंबई BMC च टेन्शन थोडं कमी होईल.

Mumbai Rain Update | Good News, लवकरच मुंबईला पाणी पुरवठा करणार दुसरा तलाव ओसांडून वाहणार
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 8:56 AM

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात मागच्या दोन-चार दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. तलाव, नदी, नाले, धरणं दुथडी भरुन वाहू लागली आहेत. या पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. पण आता महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे धरण सुद्धा भरुन वाहू लागली आहेत. देशाच अर्थकारण मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे.

जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. त्याने सर्वांचीच चिंता वाढलेली. आता जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिक सुखावले आहेत.

मुंबईला किती धरणातून पाणी पुरवठा होतो?

शेतकरी वर्गाप्रमाणेच शहरात राहणाऱ्या नागरिकांची चिंताही पावसाने वाढवली होती. कारण धरण क्षेत्रात चांगला पाऊस होणं गरजेच आहे. अन्यथा शहारतील नागरिकांना पाणी कपातीच्या संकटाचा सामना करावा लागतो. संपूर्ण मुंबईला एकूण सात धरणातून पाणी पुरवठा होतो. तानसा, मोडक सागर, तुलसी, विहार, तानसा, भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा धरणातून मुंबईला पाणी पुरवठा होतो.

मुंबईला पाणी पुरवठा करणारं दुसर धरण कुठलं भरणार?

सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव 100 टक्के भरला आहे. लवकर दुसरा तलाव तानसा भरुन वाहण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने पाऊस सुरु आहे. पावसामुळे धरण भरून वाहण्याची शक्यता आहे.

सध्या किती आहे पाणी पातळी?

तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी 128.63 मीटर टीएसडी इतकी आहे. आज ही पातळी 126.602 मीटर टीएसडीहून जास्त झाली आहे. लवकरच धरण ओसंडून वाहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, अशी सूचनाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आल्या आहेत

पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.