मुंबईच्या विकासाचा प्लॅन काय, दीपक केसरकर यांनी सांगितलं
महालक्ष्मी, सिद्धिविनायक, मुंबादेवी याठिकाणी पार्किंगची व्यवस्था उभारणार आहोत.
मुंबई : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबईतील सर्व कोळीवाड्यांना भेटी दिल्या. त्यांच्या विविध समस्या आहेत. सुविधांपासून ते वंचित आहेत. पहिला टप्पा म्हणून कोळीवाड्यांना भेटी दिल्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सोबत होते. कफ परेड, माहीम आणि ससून डॉकला भेट दिली. कोळी भगिनींनी आनंद व्यक्त केला. बर्फाचा पुरवठा, वीज व्यवस्था याची पाहणी केली. जगात फिशिंग व्हिलेज संकल्पना आहे. मॉलमध्ये स्थानिक पदार्थ विक्रीला असतात. त्याच धर्तीवर कोळीवाड्यांत सीआरझेड बाधा न लावता प्रकल्प सुरु करणार आहोत. कोळीवाड्यात सुक्या मासळीचा वास कमी करण्यासाठी ड्रायर देणार आहोत.
पायाभूत सुविधा देत आहोत. राहण्याची ठिकाणे सुसह्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. महालक्ष्मी, सिद्धिविनायक, मुंबादेवी याठिकाणी पार्किंगची व्यवस्था उभारणार आहोत. दक्षिण मुंबई हा दिवसा गजबजलेला व सायंकाळी निर्मनुष्य असतो. त्याला नवी झळाळी देणार आहोत, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
बाणगंगाच्या किनाऱ्यावर संगीताची व्यवस्था करणार आहोत. मुंबई देशाचे हृदय आहे. ते अधिक सुंदर करणार आहोत. मुंबईत मोबाईल क्लिनिक सुरु करणार आहोत. डोळे तपासणी, दंत चिकित्सा, टीबी तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येणार आहेत, अशी माहिती केसरकर यांनी दिली.
स्वच्छता स्पर्धेत मुंबई शहर उतरत आहे. शहर अव्वल करण्याचा प्रयत्न आहे. चांगले उपक्रम सुरु ठेवले पाहिजेत. मुंबई हे हॅपनिंग व हेल्दी प्लेस करणार आहोत. मुंबईला सुंदर करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. मुंबईला एक वेगळं स्वरुप देत आहोत, असंही ते म्हणाले.
जेजे रुग्णालयास नवीन एंजिओग्राफी मशीन देणार आहोत. कामा व सेंट जॉर्ज रुग्णालयात सुधारणा करतोय. शासकीय रुग्णालयांची पाहणी केली आहे.लवकरच मुंबई महापालिका रुग्णालय पाहणी करणार असल्याचं दीपक केसरकर म्हणाले.
आमदार बच्चू कडू व रवी राणा यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यांना लवकरच मुख्यमंत्री भेटतील. त्यांची समजूत काढली जाईल. एकमेकांविरोधात टीका टाळण्याचा सल्ला दिला जाईल. एकमेकांविरोधात स्टेटमेंट देऊ नये, असं सांगितलं जाईल. घटकपक्षाचे सदस्य आहेत. घटकपक्षांच्या लोकांचीही युती झाली पाहिजे. आज कोळीवाड्यांना भेटी दिल्या. आता दिवाळीमुळे अधिकारी सुट्टीवर आहेत. दिवाळीनंतर पुन्हा लोकांच्या भेटी सुरु होतील.