संभाजी ब्रिगेड ही संघटना काय आहे? संभाजी ब्रिगेडचं समाजकारण आणि राजकारण 5 मुद्द्यातून जाणून घ्या

2016साली निवडणुका लढवण्याचे संभाजी ब्रिगेडने जाहीर केले. मात्र संभाजी ब्रिगेड नेमकी काय आहे? त्याचा इतिहास, त्यांनी केलेली सामाजिक आणि राजकीय कामेदेखील पाहणे महत्त्वाचे आहे.

संभाजी ब्रिगेड ही संघटना काय आहे? संभाजी ब्रिगेडचं समाजकारण आणि राजकारण 5 मुद्द्यातून जाणून घ्या
संभाजी ब्रिगेड, शिवसेनेची युतीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 3:37 PM

मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाली आहे. आता पुढील निवडणुका हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. एकीकडे शिवसेनेतून 40 आमदारांनी बंड केले. त्यामुळे एकाकी पडलेल्या शिवसेनेला संभाजी ब्रिगेडमुळे (Sambhaji Brigade) बळ मिळणार आहे. दोन्ही पक्षांचा इतिहास हा आक्रमक आंदोलनांचा आहे. त्यामुळे भविष्यकाळात भाजपाविरोधात लढण्यासाठी हा आक्रमकपणा या दोघांनाही कामी येणार आहे. शिवसेना तर आधीपासूनच सक्रिय राजकारणात (Politics) होती. तर मागील काही काळापासून संभाजी ब्रिगेड या संघटनेने राजकारणातही उडी घेतली. 2016साली निवडणुका लढवण्याचे संभाजी ब्रिगेडने जाहीर केले. मात्र संभाजी ब्रिगेड नेमकी काय आहे? त्याचा इतिहास, त्यांनी केलेली सामाजिक आणि राजकीय कामेदेखील पाहणे महत्त्वाचे आहे. विविध

मुद्द्यांतून जाणून घेऊ, काय आहे संभाजी ब्रिगेड?

  1. स्थापना आणि उद्देश – मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी 1 सप्टेंबर 1990 रोजी या मराठा सेवा संघाची अकोल्यात स्थापना केली होती. पुरुषोत्तम खेडेकर हे मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. तेव्हा ते सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते. मराठा-कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावर आणून त्यांचे संघटन उभे करणे त्याचबरोबर समाजाचे प्रबोधन करणे हा प्रमुख उद्देश त्यावेळी होता. संभाजी ब्रिगेड ही मराठा सेवा संघाची एक शाखा म्हटले जाते.
  2. या आंदोलनाने चर्चेत – 5 जानेवारी 2004 रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर अचानक हल्ला करण्यात आला. एक जमाव आला आणि त्यांनी हल्ला केला. यात संस्थेच्या इमारतीची तसेच काही दुर्मीळ पुस्तके आणि हस्तलिखितांचे नुकसान झाले. हा हल्ला संभाजी ब्रिगेडने केला. त्यानंतर संभाजी ब्रिगेड चर्चेत आली.
  3. गिरीष कुबेर यांच्यावर शाईफेक – नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली होती. गिरीश कुबेर लिखित ‘रेनेसाँ स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता.
  4. दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवला – दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत. त्यामुळे दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा राज्य शासनाचा पुरस्कार रद्द केला जावा, क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख मागे घेतला जावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती. डिसेंबर 2010मध्ये लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविण्याच्या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचा सहभाग होता.
  5. हे सुद्धा वाचा
  6. बाबासाहेब पुरंदरेंना विरोध, वैचारिक प्रतिवाद – बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या शिवचरित्रातून राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीच्या गोष्टी मांडून बदनामी केल्याचा सातत्याने आरोप संभाजी ब्रिगेडकडून केला जातो. पुरंदरेंच्या आक्षेपार्ह लिखाणाला संभाजी ब्रिगेडने कायमच विरोध केला. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासही विरोध करण्यात आला होता. संभाजी ब्रिगेड वैचारिक प्रतिवादाची पुरस्कर्ती संघटना आहे. आंदोलने करण्याआधी चर्चा करण्याचा प्रयत्न संघटनेकडून केला जातो. मात्र अनेकवेळा प्रतिसाद न मिळाल्यास आक्रमक होत आंदोलने करण्याशिवाय पर्याय नसल्याचे संघटनेकडून सांगण्यात येते.

संभाजी ब्रिगेड, शिवसेना पत्रकार परिषद

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.